आज बैल पोळा

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज शुक्रवार, ऑगस्ट २२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ३१, शके १९४७
सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १९:०१
चंद्रोदय : ०६:१४, ऑगस्ट २३ चंद्रास्त : १८:३५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्दशी – ११:५५ पर्यंत
नक्षत्र : आश्लेषा – ००:१६, ऑगस्ट २३ पर्यंत
योग : वरीयान् – १४:३५ पर्यंत
करण : शकुनि – ११:५५ पर्यंत
द्वितीय करण : चतुष्पाद – २३:४१ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : कर्क – ००:१६, ऑगस्ट २३ पर्यंत
राहुकाल : ११:०६ ते १२:४१
गुलिक काल : ०७:५६ ते ०९:३१
यमगण्ड : १५:५१ ते १७:२६
अभिजित मुहूर्त : १२:१६ ते १३:०७
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४४
दुर्मुहूर्त : १३:०७ ते १३:५७
अमृत काल : २२:४० ते ००:१६, ऑगस्ट २३
वर्ज्य : १३:०० ते १४:३७

या मराठी मातृदिनाच्या दिवशी माता , पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका (देवीची रूपे) ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात आणि आपले सौभाग्य आणि विशेषतः मुलांसाठी आयुरारोग्य, सुखसंपत्ती वगैरे मागून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. व्रतासाठी केलेले पक्वान्न म्हणजे बहुधा पु-या डोक्यावर घेऊन “कोण अतिथी आहे काय?’ असे विचारतात. एकेक मुलांनी मागून येऊन उत्तर द्यायचे. “मी आहे.” आणि एक पुरी घ्यायची. अखेर आईने त्या सगळ्या मुलांना पक्वान्ने खायला घालायची. पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत, सध्या तशी चित्रे मिळतात. या दिवशी नैवेद्यासाठी सगळी पिठाची पक्वान्ने बनवतात म्हणून या दिवसाला “पिठोरी अमावस्या’ असे नाव पडले असणार.

आज पिठोरी अमावस्या / मातृदिन आहे.

बैल पोळा – शेतकरी लोकांचा हा एक सणच असतो. शेतकऱ्यांचा महत्वाचा साथीदार बैल. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा पारंपरिक सण म्हणजे ‘पोळा ‘

आज बैल पोळा आहे.

  • श्री एकनाथजी रानडे आणि विवेकानंद शिला स्मारक – एखादा सामान्य वाटणारा माणूस देहभक्तीने आणि समाजप्रीतीने भारला गेला तर केवढे मोठे कार्य उभे करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथजी रानडे आणि त्यांनी उभारलेले कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारक! ‘बंगालमध्ये जन्माला आलेल्या’ विवेकानंदांचे स्मारक तमिळनाडूमध्ये कशाला उभारायचे, असा प्रश्न विचारणाऱ्या मुख्यमंत्री भक्तवत्सलम यांच्यासह सर्वांना बरोबर घेऊन एकनाथजींनी ज्या पद्धतीने ते भव्य
    शिला स्मारक उभारून दाखवले, ते खरोखरच लोकविलक्षण होते. ती मोहीम यशस्वी करून दाखवताना त्यांनी जे संघटनाचातुर्य दाखवले होते, ते पाहून लालबहादूर शास्त्रींनी असे सहज उद्गार काढले होते की, ‘मला दोन एकनाथ रानडे मिळाले, तर मी काँग्रेसचे भवितव्य बदलवून दाखवीन.’ तथापि एकनाथजींचे सारे गुणवैभव एखाद्या राजकीय पक्षाच्या विस्तारासाठी किंवा एखाद्या प्रभावी क्षेत्राच्या परिवर्तनासाठी वापरले जावे, असा नियतीचा संकेतच नव्हता मुळी. ते झाले होते पूर्ण देशाला समर्पित असे जीवनव्रती.

रा. स्व. संघाचे संस्कार तनमनात मुरवत एकनाथ रानडे सर्वार्थाने विकसित होत गेले.

एकीकडे शारीरिक कसरतीच्या मार्गाने मिळवलेली शक्ती अरेरावी करणाऱ्या ब्रिटिश सैनिकांविरुद्ध वापरून रेल्वेच्या डब्यातील आपली आणि आपल्या बरोबरच्या स्वयंसेवकांची जागा परत मिळवण्याइतपत तो धट्टाकट्टा झाले होते; तर दुसरीकडे उपनिषदांपासून ‘गीतारहस्या’पर्यंत अनेक धर्मग्रंथांचे वाचन-मनन करून मिळवलेले ज्ञान महाविद्यालयातील बायबलच्या तासाला वापरून ख्रिस्ती मिशनरी प्राध्यापकांकडून केली जाणारी हिंदू धर्माची निंदानालस्ती थांबवण्याइतका तो वादपटूही झाला होता. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन नागपूर विद्यापीठामधून एम. ए. पदवी मिळवताना त्याने विवेकानंद साहित्याचे अनेकदा वाचन केले. स्वामीजींच्या कार्याचा, संदेशाचा त्याच्यावर खूप खोलवर परिणाम झाला. त्या कार्याशी-संदेशाशी संघकार्याचा गाभा सुसंगत असल्याचे त्याला त्यावेळीच जाणवले आणि घरच्यांचा लग्नाचा आग्रह डावलून तो रा. स्व. संघाचा प्रचारक झाले.

कन्याकुमारीच्या ‘स्वामी स्मारका’चे शिल्पकार एकनाथ रानडे यांचा आज स्मृतिदिन. अमरावती जिल्ह्यातील तिमताला येथे दि. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी जन्मलेला हा एकनिष्ट संघ स्वयंसेवक. नागपूर विद्यापीठातून तत्त्वज्ञानातील एम. ए. व सागर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केलेल्या एकनाथजींना शालेय जीवनापासूनच डॉ. हेडगेवारांचा सहवास लाभला होता. त्यांच्याच प्रभावामुळे ‘स्वयंसेवक’ बनलेल्या एकनाथजींनी पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाहक पदही भूषवले.

सन १९६३ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी ‘राऊजिंग कॉल टू हिंदू नेशन’ हा ग्रंथ संकलित केला आणि लगेचच क न्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाची कार्यधुरा उचलली. एकनाथजींच्या अथक परिश्रमामुळे आणि कल्पकता, चिकाटी आणि संघटना कौशल्यामुळेच ते भव्य स्वप्न सत्यात उतरून आज हिंदी महासागरात दिमाखाने उभे आहे.

स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत अशा बलवादी भारताची उभारणी त्याग आणि सेवा यांच्या आधारेच घडवावी म्हणून एकनाथजींनी ते सा-या राष्ट्राला मार्गदर्शक ठरावे, असे ‘विवेकानंद केंद्र’ – अशा या एकनाथजींनी दि. २२ ऑगस्ट १९८२ रोजी अखेरचा श्वास घेतला.

• १९८२: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)

  • घटना :
    १६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.
    १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला.
    १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना.
    १९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते.
    १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला.
    १९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
    १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
    १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
    १९७२: वर्णद्वेषी धोरणाबद्दल झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.

• मृत्यू :
• १९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
• १९८९: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)
• १९९५: संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक पं. रामप्रसाद शर्मा यांचे निधन.
• १९९९: मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे निधन. ( जन्म : २ जून, १९२६ )
• २०१४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यू. ए. अनंतमूर्ती यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९३२)

  • जन्म :
    १९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९९७)
    १९१९: हिंदी कवी गिरिजाकुमार माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९९४)
    १९३५: कथ्थक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)
    १९५५: अभिनेते आणि केंद्रीय मंत्री चिरंजीवी यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »