ऊसतोडणी मजूर पुरविण्याचे आमिष; १५ लाखांची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा


कागल : ऊसतोडणी मजूर पुरवतो म्हणून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील एकावर कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल नारायण पाटील (रा. बानगे,ता. कागल) यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

विशाल पाटील यांना गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची आवश्यकता असल्‍याने पाटील हे शिवाजी पोवार यांच्या संपर्कात आले. शिवाजी पोवार याने २० माणसे ऊसतोडणीकरिता पुरवितो, असे सांगून ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच रोख रक्कम ९ लाख ५० हजार रुपये घेऊन जाऊन ठरल्याप्रमाणे ऊसतोड मजूर पुरविलेच नाहीत. वारंवार त्‍याच्याशी याबाबत पाठपुरावा करूनही पोवार याने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच विशाल पाटील यांनी शिवाजी पोवार याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. त्‍यानुसार शिवाजी पोवार याच्यावर कागल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव जमादार करीत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »