राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांबद्दल बाजीराव सुतार यांचा विशेष गौरव

अहिल्यानगर : – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी बाजीराव जी. सुतार यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रीय स्तरावरील दोन मानाचे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते श्री. सुतार यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या सत्कार समारंभास उत्तर देतांना सुतार म्हणांले की, हा पुरस्कार हा मी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांना समर्पित करतो. तसेच गेल्या ३९ वर्षापासुन सहकारात काम करतांना आपल्याला सहकार भूषण पुरस्कार २०१३, तसेच वारणा कारखान्यांत काम करतांना उत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार, तसेच इंदापुर कारखान्यांत काम करीत असतांना देशातील सर्वोच्च साखर निर्यातीचा २०१९ पुरस्कार प्राप्त झाले, तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात काम करतांना स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या संकल्पनेमुळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, विद्यमान चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनामुळे उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार २०२१,बेस्ट इनोव्हेटिव्ह शुगर फॅक्टरी इन इंडिया २०२२, नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपुर यांच्यावतीने उत्कृष्ट नाविन्यपुर्ण कारखाना २०२३ व सर्वोत्कृष्ट उद्योजगता पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट पुणे २०२४ हे पुरस्कार कारखान्यास मिळाले.
