बाळूमामा पुण्यतिथी

आज गुरुवार, सप्टेंबर ४, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १३, शके १९४७
सूर्योदय : ०६:२४
सूर्यास्त : १८:५१
चंद्रोदय : १६:३२
चंद्रास्त : ०३:४८, सप्टेंबर ०५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – ०४:०८, सप्टेंबर ०५ पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – २३:४४ पर्यंत
योग : सौभाग्य – १५:२२ पर्यंत
करण : बव – १६:२० पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०४:०८, सप्टेंबर ०५ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : मकर
राहुकाल : १४:११ ते १५:४४
गुलिक काल : ०९:३१ ते ११:०४
यमगण्ड : ०६:२४ ते ०७:५७
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०२
दुर्मुहूर्त : १०:३३ ते ११:२३
दुर्मुहूर्त : १५:३१ ते १६:२१
अमृत काल : १७:१० ते १८:४९
वर्ज्य : ०७:२० ते ०८:५८
वर्ज्य : ०३:४३, सप्टेंबर ०५ ते ०५:१८, सप्टेंबर ०५
सत्यव्वा रिंगण तोडे | सवेची गर्भही पडे ।
मामांचा वंश खुडे । स्त्रीहट्टापायी ।।
मामा झाले अति खिन्न । टाकले पाणी तथा अन्न ।
सत्यव्वाशी माघारण । आयुष्यभरी ।।
आज संत बाळूमामा पुण्यतिथी आहे.
आज मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षू संत गुलाब महाराज पुण्यतिथी आहे ( भाद्रपद शु. १२ वामनव्दादशी रोजी पुणे मुक्कामी, चाकण ऑइलमिलच्या परिसरातील वास्तूत शेवटच्या क्षणी देखील स्वताच्या अनुभवाचा दाखला देऊन शास्त्र निष्ठेचा नारायण पंडितांना उपदेश केला आणि सूर्योदयाचे समयी ब्रह्मस्थानी प्रस्थान केले. )
संपादक डॉ. धर्मवीर भारती – आधुनिक हिंदी साहित्यिक व धर्मयुग या हिंदी साप्ताहिकाचे संपादक. – १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे एक वर्ष शिक्षणात खंड पडला. १९४५ मध्ये बी. ए. परीक्षेत हिंदी विषयात सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘चिंतामणी घोष पदक’ मिळवले. १९४७ मध्ये ते प्रथम श्रेणीत एम्. ए. झाले. पुढे धीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिद्ध साहित्य’ या विषयावर संशोधन करून त्यांनी पी. एच्. डी. मिळवली.
अभ्युदय पत्रिकेत अर्धवेळ नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतले. १९४४ साली संगममध्ये सहकारी संपादक झाले. नंतर एक वर्ष हिंदुस्तानी अकॅडेमीमध्ये उपसचिवाचे काम केले. नंतर प्रयाग विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९६० पर्यंत तेथे कार्य केल्यावर धर्मयुग या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते मुंबईस आले व तेव्हापासून आजपर्यंत धर्मयुग मध्येच प्रमुख संपादक या नात्याने कार्य करीत आहेत.
कॉमनवेल्थ रिलेशन्स कमेटीच्या निमंत्रणावरून १९६१ मध्ये पहिली विदेश यात्रा त्यांनी केली. इंग्लंड व यूरोपीय देशांत ते जाऊन आले. १९६२ मध्ये जर्मनीचा, १९६६ मध्ये इंडोनेशिया व थायलंडचाही त्यांनी प्रवास केला. १९६७ मध्ये संगीत अकादमीचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९७१ मध्ये त्यांनी मुक्तिवाहिनीबरोबर बांगला देशाची गुप्त यात्रा केली व त्या क्रांतीचे प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले विवरण धर्मयुग मधून प्रकाशित केले. १९७१ मधील भारत – पाक युद्धाच्या वेळी भारतीय स्थलसेनेबरोबर युद्धआघाडीवरील रोमहर्षक अनुभवही त्यांनी घेतला. १९७४ मध्ये त्यांनी मॉरिशसची यात्रा केली व मॉरिशसच्या भारतीय रहिवाशांच्या समस्यांचे अध्ययन केले.
भारती बहुमुखी प्रतिभेचे लेखक असून मुख्यतः ते कवी म्हणून प्रख्यात आहेत. ‘अज्ञेय’ यांनी संपादित केलेल्या दूसरा सप्तक मध्ये प्रातिनिधिक महत्वाचे कवी म्हणून त्यांचा समावेश झाला आहे.
त्यांचे नाटक अंधायुग (१९५५) हिंदी साहित्यात एक मैलाचा दगड मानले जाते. कौरव पांडवांच्या भारतीय युद्धाची समाप्ती आणि त्यानंतरची जीवनात आलेली मूल्यभ्रष्टता व दारुण दुःख ही या पद्य नाटकाची पार्श्वभूमी आहे. पण यातून भारतींनी स्वातंत्र्यानंतर भारतात निर्माण झालेल्या दारुण व शोकजनक परिस्थितीचा वेध घेतला असून समकालीन माणसाच्या शोकान्त नियतीचे मोठे करुण गंभीर चित्र रेखाटले आहे. भारती विचारांनी आधुनिक आहेत पण त्यांचे विचार व भावना यांना भारतीय परंपरेचा सुदृढ आधार आहे हे त्यांच्या अंधायुगमध्येच नव्हे, तर कनुप्रियासारख्या तरल, कोमल, काव्यातूनही स्पष्ट दिसते. कनुप्रिया (१९५८) मध्ये राधेच्या उत्कट प्रणयभावनेतील वेदना व्यक्त करण्यात कवीला कमालीचे यश लाभले आहे पण त्यापलीकडे जाऊन भारतीय समाजात पुरुषाने स्त्रीच्या केलेल्या उपेक्षेचे व स्त्री पुरुषांच्या प्रेमगर्भ द्वंद्वात्मकतेचे चिरंतन भावविश्वही त्यात उमटले आहे. ठंडा लोह (१९५२), सात गीत वर्ष (१९५७) या काव्यसंग्रहांत त्यांची स्फुट कविता संकलित आहे.
भारतींना हिंदीच्या ‘नयी कथा’ आंदोलनात भरीव कामगिरी केली आहे. मुर्दों का गांव (१९४८), चांद और टूटे हुए लोग (१९५२), बंद गली की आखिरी मकान (१९६४) हे त्यांचे तीन कथासंग्रह गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.
ऐन पंचविशीत लिहिलेली त्यांची कादंबरी गुनाहोंका देवता (१९४९) लोकप्रियतेच्या दृष्टीने फारच गाजली. सूरज का सातवां घोडा (१९५१) ही कादंबरी प्रयोगधर्मी असून वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ती त्यांनी लिहिलेली आहे. या कादंबरीतही समकालीन जीवनातील विसंगती व मूल्यभ्रष्टता तीव्रपणे व्यक्त झाली आहे.
भारतींच्या गद्यलेखनात नाट्यात्मकतेचा गुण आहेच पण त्यांचा नदी प्यासी थी (१९५४) हा एकांकिकासंग्रह त्यांच्या या गुणाची पूर्ण साक्ष देतो. भारतींच्या निबंधसाहित्यात त्यांनी देशोदेशी केलेल्या प्रवासाची मोठी सुंदर वर्णने असून मार्मिक अवलोकनक्षमता, भिन्न भिन्न संस्कृतींतील वैशिष्ट्ये टिपण्याचे कौशल्य यांचा चांगला प्रत्यय येतो. ठेले पर हिमालय (१९५३), कहनी अनकहनी (१९६५), पश्यंती (१९६६) हे त्यांचे निबंध संग्रह होत.
धर्मवीर भारतींनी हिंदी साहित्यातील नव्या वैचारिक व साहित्यिक चळवळीत सक्रिय भाग घेतला व नव्या साहित्याच्या प्रतिष्ठापनेसाठी विचारांची बैठक प्राप्त करून दिली.
मानवमूल्य और साहित्य (१९६२) हा त्यांचा दर्जेदार ग्रंथ हिंदी वैचारिक साहित्यात महत्वाचा मानला जातो. तत्पूर्वी त्यांनी प्रगतिवाद : एक समीक्षा (१९५३) या ग्रंथात साम्यवाद व त्याचे साहित्यिक विचार यांचा उत्तम परामर्श घेतला आहे. याशिवाय त्यांनी निकष व आलोचनासारख्या प्रतिष्ठित साहित्यिक नियतकालिकांच्या संपादनकार्यातही सहयोग दिला आहे. १९६० पर्यंत साहित्यिक म्हणून व त्यानंतर धर्मयुग चे संपादक म्हणून भारतींनी हिंदी साहित्याची केलेली सेवा मोठी आहे.
१९७२ मध्ये सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा गौरव केला.
• १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)
उद्योगपती सायरस पालोनजी मिस्त्री – हे १८८७ साली स्थापन झालेल्या ‘टाटा सन्स’ ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. ते २०१२ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.
रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांनी २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी घेतलेले आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालक म्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालोनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.
४ सप्टेंबर २०२२ रोजी, मिस्त्री आणि पांडोले कुटुंबातील तीन सदस्यांनी उदवाडा येथे इराणशाह अताश बेहरामला भेट दिली.[१] मुख्य धर्मगुरू खुर्शेद दस्तूर यांनी पुष्टी केल्याप्रमाणे, दिनशॉ पांडोले आणि पालोनजी मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर समूह प्रार्थना करण्यासाठी ते गेले होते. उदवाडाहून मुंबईला परतत असताना, त्यांच्या मर्सिडीज बेंझ जीएलसी गाडीचा पालघर येथे सूर्या नदी वरील पूलावर दुभाजकावर अपघात झाला.
२०२२ : उद्योगपती सायरस पालोनजी मिस्त्री यांचे अपघाती निधन ( जन्म : ४ जुलै, १९६८ )
- घटना :
१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.
१८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
१९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
२००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
• मृत्यू :
• २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२२)
• २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर१९३०)
• २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)
२०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन ( जन्म : २३ एप्रिल , १९२७ )
- जन्म :
१८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून१९१७)
१९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)
१९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००३)
१९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म. ( मृत्यू : २८ जानेवारी , २०२१)
१९४१: महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडणारे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.
१९५२: अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म. . (मृत्यू : ३० एप्रिल, २०२० )
१९६२: यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म.
१९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर, २०१५)