बलिदान दिन

आज रविवार, मार्च २३, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २, शके १९४७
सूर्योदय : ०६:४० सूर्यास्त : १८:५०
चंद्रोदय : ०२:४२, मार्च २४ चंद्रास्त : १२:४९
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – ०५:३७, मार्च २४ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – ०४:१८, मार्च २४ पर्यंत
योग : वरीयान् – १७:५९ पर्यंत
करण : तैतिल – १७:३६ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०५:३७, मार्च २४ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १७:१९ ते १८:५०
गुलिक काल : १५:४८ ते १७:१९
यमगण्ड : १२:४५ ते १४:१६
अभिजित मुहूर्त : १२:२१ ते १३:०९
दुर्मुहूर्त : १७:१३ ते १८:०१
अमृत काल : २३:१९ ते ००:५९, मार्च २४
वर्ज्य : १३:२१ ते १५:०१
वर्ज्य : १०:१८ ते १२:०१
वर्ज्य : ०१:४१, मार्च २३ ते ०३:२३, मार्च २३
आज जागतिक हवामान दिवस आहे.
स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव –
ख्रिस्ताब्द १९२८ मध्ये भारतीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून सायमन कमीशन’ नावाचे शिष्टमंडळ भारतात आले. भारतात सर्वत्र या शिष्टमंडळाचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. त्या वेळी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
सायमन परत जा’ च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. जमाव पांगवण्यासाठी आरक्षकांनी केलेल्या अमानुष लाठीआक्रमणात लाला लजपतराय घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. देशभक्तीने भारावलेल्या क्रांतीकारकांना हे सहन झाले नाही. क्रांतीकारकांनी लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या लाहोर आरक्षक ठाण्यातील इंग्रज अधिकारी सँडर्स याला ठार मारण्याचे ठरवले. त्याप्रमाणे लालाजींच्या पहिल्या मासिक श्राद्धाच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही वेष पालटून आरक्षक अधिकारी यांच्या निवासस्थानापाशी गेले. सँडर्स दिसताच सुखदेव याने संकेत केला.
भगतसिंग आणि राजगुरू यांनी एकाच वेळी गोळया झाडून त्याचा बळी घेतला आणि तेथून पलायन केले. इंग्रज सरकारने तिघांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तसेच त्यांना पकडून देणार्याला पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणाही केली; परंतु बरेच दिवस आरक्षकांना हुलकावणी देत ते तिन्ही क्रांतीकारक भूमिगत राहिले. पुढे फितुरीमुळे ते पकडले गेले. शेवटी २३. ३. १९३० या दिवशी भारतमातेच्या या तिन्ही सुपुत्रांना फाशी देण्यात आली.
स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव
भगतसिंग – जन्म : भगतसिंग याचा जन्म २७.९.१९०७ या दिवशी पंजाब राज्यातील एका सरदार घराण्यात झाला.
बालपण : भगतसिंग ६-७ वर्षांचा असतानाची गोष्ट. तो शेतावर गेला असता शेतकरी गहू पेरत असलेला पाहून त्याचे कुतुहल जागृत झाले. त्याने विचारले “शेतकरीदादा, तुम्ही या शेतात गहू का टाकत आहात ?” शेतकरी म्हणाला, “बाळ, गहू पेरले की, त्याची झाडे होतील आणि प्रत्येक झाडाला गव्हाची कणसेच कणसे येतील.” त्यावर तो म्हणाला, “मग जर बंदुकीच्या गोळया या शेतात पेरल्या, तर त्याचीही झाडे उगवतील का ? त्यालाही बंदुका येतील का ?” या गोळया कशाला हव्यात’, असे शेतकर्याने विचारल्यावर
हिंदुस्थानचे राज्य बळकावणार्या इंग्रजांना मारण्यासाठी’, असे क्षणाचा विलंब न करता त्याने आवेशपूर्ण उत्तर दिले.
युवावस्था : पुरेसे महाविद्यालयीन शिक्षण, घरातील सर्व परिस्थिती अनुकूल असतांनाही त्यांनी देशसेवेसाठी आजन्म अविवाहित रहाण्याची प्रतिज्ञा केली आणि ती निभावूनही नेली. ते नौजवान भारत सभा’,
कीर्ती किसान पार्टी’ आणि `हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनांशी संबंधित होते.
शिवराम हरी राजगुरू – जन्म : २४.८.१९०८ या दिवशी महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळील खेड येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात शिवराम राजगुरू याचा जन्म झाला. अचूक नेमबाजी, दांडगी स्मरणशक्ती याची त्यांना जन्मजात देणगी होती. कितीतरी ग्रंथ त्यांना मुखोद्गत होते. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे ते सदस्य होते.
सुखदेव थापर – सुखदेव यांचा जन्म पंजाब राज्यामध्ये, १५.५.१९०७ या दिवशी झाला. भगतसिंग आणि राजगुरू यांचे सहकारी हीच सुखदेव यांची प्रमुख ओळख.
सुखदेव यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान – सुखदेव हेही हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे कार्यकारी सदस्य होते. त्यांच्यावर क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांच्या विचारांचा पगडा होता. लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असतांना त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांतीविषयक, तसेच रशियाच्या क्रांतीविषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक मंडळ स्थापन केले. भगतसिंग, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवतीचरण व्होरा यांच्या सहयोगाने त्यांनी लाहोर येथे नौजवान भारत सभेची स्थापना केली. युवकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे, शास्त्रीय दृष्टीकोन अंगिकारणे, साम्यवादाविरुद्ध लढा देणे आणि अस्पृश्यता निवारण ही या सभेची उद्दिष्टे होती. ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये कारागृहात असतांना कारागृहातील सहकार्यांच्या होत असलेल्या अनन्वित छळाच्या विरोधात चालू केलेल्या भू्क हरतालातही त्यांचा सहभाग होता.
१९३० : आज शहीद दिन हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांचा बलिदान दिन आहे.
गोविंदा पै यांचा जन्म कोकणी गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात मंजेश्वर येथील त्यांच्या आजोबांच्या घरी झाला. ते मंगलोर साहुकार थिम्मप्पा पै आणि देवकी अम्मा यांचे पहिले पुत्र होते . गोविंदा पै मिशन स्कूलमध्ये गेले आणि नंतर मंगळूरच्या कॅनरा हायस्कूलमध्ये गेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पै मद्रास ( चेन्नई ) येथे गेले. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांना परतावे लागले.
त्यांच्या आयुष्यातील जवळपास साठ वर्षे मंजेश्वर येथील या घरात गेली.
कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंदा पै – हे एक विपुल गद्य लेखक होते. श्रीकृष्ण चरित (1909) ही त्यांची गद्यातील सर्वात जुनी रचना होती जी उल्लेखनीय वाचन करते. गोविंदा पै यांनी त्यांच्या ‘गोलगोथा’ (1931) या ग्रंथात ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळलेल्या कथेचे वर्णन केले . त्यांनी प्रकाशित केलेले पुढील तीन विहंगम ; वैशाखी, प्रभासा आणि देहली, अनुक्रमे बुद्ध, भगवान कृष्ण आणि गांधी यांच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन केले; गोलगोथा च्या प्रचंड यशाचा परिणाम होता. कोऱ्या श्लोकात लिहिलेल्या त्याच्या सर्वोत्कृष्ट कृती, उदा., गोलगोथा ( ख्रिस्ताचे शेवटचे दिवस , 1937 मध्ये प्रकाशित), वैशाखी ( 1946 मध्ये प्रकाशित झालेले बुद्धाचे शेवटचे दिवस ) आणि हेबेरालू ( द थंब , एकलव्याची कथा पुन्हा सांगितली. , 1946 मध्ये प्रकाशित) कन्नड साहित्यातील महान कवींच्या दालनात कायमस्वरूपी स्थान पटकावले आहे. गोमाता जिनस्तुती ही त्यांची पहिली प्रकाशित रचना होती. त्यांनी कन्नड भाषेत सॉनेट प्रकार सादर केला. हेब्बेरलू हे महाभारतातील पात्र द्रोण आणि एकलव्य यांच्या कथेचे नाट्यमयीकरण करतात.
गोविंदा पै यांनीही त्यांच्या ऐतिहासिक अभ्यासाने आणि संशोधनाने कन्नड भाषा समृद्ध केली. तुलुनादच्या कालगणना आणि इतिहासावर ते अधिकारी होते. त्यांची कार्ये त्यांच्या सार्वभौमिक दृष्टिकोनाची तसेच गरीब आणि दीनदलित लोकांबद्दलच्या त्यांच्या खोल करुणेची साक्ष देतात.
तुलु , मल्याळम , संस्कृत , तेलुगु , तमिळ , मराठी , बंगाली , पर्शियन , पाली , उर्दू , ग्रीक आणि जपानी या व्यतिरिक्त कन्नड , कोकणी आणि इंग्रजी यासह २५ भाषांमध्ये ते अस्खलितपणे वाचू आणि लिहू शकले . त्यांनी अनेक जपानी कलाकृती कन्नडमध्ये अनुवादित केल्या .
त्यांचे कवितासंग्रह पुढीलप्रमाणे आहेत. – गिलिविंदू (1930) (पोपटांचे कळप), त्यांचा पहिला संग्रह ಗಿಳಿವಿಂಡು मध्ये 46 कवितांचा समावेश आहे ज्यामध्ये कवींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, देशावरील त्यांचे प्रेम, त्यांच्या सभोवतालच्या निसर्गाबद्दलची प्रतिक्रिया आणि कन्नडवरील त्यांचे प्रेम दर्शविते .
नंदादीपा ( चिरस्थायी दिवा ) त्यांच्या नंदादीपामध्ये 37 कवितांचा समावेश आहे, देवाच्या भक्तीची श्रद्धांजली. श्री पै यांचे नाव कन्नड भाषेच्या क्षेत्रात तसेच कन्नड लोकांच्या मनात सदैव स्मरणात राहील.
१९४९ मध्ये तत्कालीन मद्रास सरकारने त्यांना राष्ट्रकवी पुरस्कार प्रदान केला. १९५१ मध्ये मुंबई येथे कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला .
१८८३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)
- घटना :
१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.
१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.
१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.
१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.
२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.
२०२१ : आफ्रिका खंडातील देश नायजरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारामुळे एका गावाचे स्मशानात रुपांतर झाले. दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन तासांत १३७ जण ठार झालेत. दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली.
• मृत्यू :
२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी, १९१३)
२००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.
- जन्म :
१९२९: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचा जन्म. (निधन: ७ सप्टेंबर २०२०)
१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)
१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)
१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)
१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)
१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)
१९५३: भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.
१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.
१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.