‘अशोक’चे चेअरमन मुरकुटे यांचा गेम झाला काय?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बंगला घेऊन देतो, मुलाला नोकरी मिळवून देतो तसेच शेतजमीन घेऊन देतो अशी आमिषे दाखवून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकुटे यांनी वेळोवेळी अत्याचार केले, असे आरोप करीत एका ३५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरुन मुरकुटे यांना अटक होऊन दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मुरकुटे यांच्यावरील हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत. त्याचवेळी मुरकुटेंना म्हातारचाळा लागल्याची आवई त्यांच्या विरोधकांमधून उठविली जात आहे. राजकारणाची ही खालावलेली पातळी श्रीरामपूरकरांना कोणते दिवस दाखवणार हे येणारा काळच ठरवेल.

विठ्ठल लांडगे, वरिष्ठ पत्रकार

(संपादक, लोकआवाज)

भानुदास मुरकुटे है तब्बल तीन वेळा श्रीरामपूरचे आमदार होते. सध्या ते अशोक सहकारी बँकेचे व अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पदही मुरकुटे भूषवत आहेत. श्रीरामपूरच्या राजकारणात मुरकुटेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे हक्काचे मतदान आहे आणि विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊ ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुरकुटे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा श्रीरामपूरच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतो, हे मात्र नक्की.

सहमतीने शरीरसंबंध असल्यास तो बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असे अलिकडच्या काळात बलात्काराच्या गुन्ह्यांत थेट सुप्रिम कोर्टानेच सायटेशन दिले आहेत. त्यामुळे भानुदास मुरकुटे यांच्यावरील बलात्काराचा गुन्हा न्यायालयीन कसोटीवर किती टिकेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तथापि, दाखल गुन्ह्यातून मुरकुटे यांथी जी बदनामी झाली, ती भरून निघेल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीच राहील. एवढेच काय ते गुन्ह्याचे फलित ठरु शकेल. त्याचा पांडोळा पहावा लागेल. भानुदास मुरकुटे यांनी जी आश्वासने दिल्याचे ती महिला सांगत आहे. तशी आश्वासने खरेच मुरकुटे यांनी दिली होती का, त्याच्याही मुळाशी पोलिसांना जावे लागेल.

व

विधानसभेच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने त्यास स्थानिक राजकाणाचा वास नक्कीच येणार, त्यादृष्टीनेही पोलिस तपास होईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक कंगोरे समोर येत आहेत. ते जर खरे असतील तर कावळ्याला उडायला अन् फांदी मोडायला एकच वेळ सापडली गेली, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. आता मुरकुटे मांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचे राजकीय भांडवल होणार की काळ्या दगडावरची रेघ आहे.

जो गुन्हा मुरकुटे यांच्याविरुद्ध दाखल झाला, त्या गुन्ह्याची मुळ कागदपत्रच पोलिसांनी त्यांना उपलब्ध करून दिली नाहीत, त्यामुळे न्यायालयात त्यावरून पोलिसांचीच भंबेरी उडाली, हे सर्वांनीच पाहिले. दाखल गुन्ह्याबाबत म्हणणे मांडण्यासाठी पोलिसांनी घेतलेला वेळ अनेक शंका उपस्थित करतो, हे नक्की. त्यात भानुदास मुरकुटे यांचे वय आता ८२ वर्षाचे आहे. त्यांनी ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

त्यासाठी पुराव्यादाखल पीडित महिलेने काही फोटो व व्हिडिओ दिल्याची माहिती पोलिसांनीच दिली. वास्तविक चाकू, तलवार किंवा बंदुकीच्या धाकावर किंवा ब्लॅकमेल करत झालेल्या शरीरसंबंधास बलात्कार महणता येईल, यात मुरकुटे यांनी कोणता चाकू, तलवार, कोयता किवा बंदक बापरल्याचा उल्लेख नाही. त्यात मुरकुटे यांचे वय पहाता ते ३५ वर्षे वयाच्या महिलेवर बळजबरी कशी करतील, हा सामान्य माणसासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय ठरतो, हेही तेवढेच खरे.

मुरकुटे यांनी २०१९ वे २०२४ या काळात बंगला घेवून देतो, मुलाला नोकरी मिळून देतो व शेतजमीन घेऊन देतो असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. मादक पदार्थ देऊन पाथरी, श्रीरामपूर, मुंबई, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हा अत्याचार केल्याचा दावा पौडितेने केलेला आहे. त्यावरुन मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात ३७६ (२), ३२८, ४१८,५०६ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

मुळात कथित पीडित महिलेने गेल्या पाच वर्षांत विरोध कसा केला नाही, किंवा त्याच वेळी फिर्याद का दिली नाही, याचेही उत्तर पोलिसांना शोधावे लागेल. त्यामध्ये मुरकुटे केवळ राजकीय षड्‌यंत्राचा बळी ठरु नयेत, हीच त्यांच्या कार्यकत्यांचीही भावना आहे. मुरकुटे यांच्यावरील हा खटला भविष्यात न्यायालयीन कसोटीवर किती काळ टिकेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. त्यातून केवळ मुरकुटे यांच्या इभ्रतीला बट्टा लागला, एवढाच काय तो अन्ययार्थ निघेल अन् उतारवयात त्यावरुन होणारी टीका तेवढी मुरकुटे यांना सहन करावीच लागेल. राहिला प्रश्न राजकीय षड्यंत्राच्या धुराळ्याचा, आगामी विधानसभा निवडणु‌कीच्या निमित्ताने त्याचे किती भांडवल करता येईल, त्यावर मुरकुटे यांची इभ्रतीचा पंचनामा ठरलेला असेल, हेही तेवढेच खरे!

मुरकुटेंना अडकल्याची भावना
वयाची ८२ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे बलात्कार कसा करू शक्तील, अशी भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुरकुटे यांना केवळ बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असल्याची भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे पोलिसांना अगदीच तटस्थपणे याकडे पहावे लागेल. त्या आरोपांचा जसा पीडितेला न्याय देताना परिणाम व्हायला नको, तसेच मुरकुटे यांच्यावरही जाणीवपूर्वक अन्याय व्हायला नको, हेही तेवढेच खरे. आरोपांची सत्यता पडताळून पाहताना वरील ज्या आश्वासनांचा मुद्दा समोर आला आहे, तशी आश्वासने खरोखरच मुरकुटे यांनी दिली होती का? किंवा कोणाच्या दबावापोटी पीडितेने तसे म्हटले आहे? त्यातील काही आश्वासने पूर्ण झालीत का? त्यावरही पोलिसांनी तपासात फोकस करायला हवा. म्हणजे शरीरसंबंध असेलही मात्र, तो बलात्कारच आहे का? हेही त्यातून स्पष्टपणे समाजासमोर आणावे लागेल.

गुन्हा तेव्हाचा.. आणि आताचा!
काही वर्षांपूर्वी मुरकुटे यांच्यावर एका पंचायत समिती सदस्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी मुरकुटेंनी जामीन घेण्यास नकार दिला अन् ते विसापूरच्या जेलमध्ये जाऊन बसले. त्यावेळी त्यांना फसवित्त्याची भावना जनमानसांची होती. त्याचा त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. मात्र, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. आजच्या परिस्थितीचा कोणाला लाभ मिळणार, हे पाहावे लागेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »