‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर भारत तावरे यांची निवड

कोल्हापूर : साखर उद्योग क्षेत्रात गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळाच्या (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) सदस्यपदी श्री दत्त इंडियाचे उपाध्यक्ष (व्हाइस प्रेसिडेंट) आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणारे तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व भारत तावरे यांची निवड करण्यात आली आहे.
साखर उद्योग क्षेत्राचे ज्ञान, अनुभव, समर्पण वृत्ती इ. गुणांमुळे आपली या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे ‘भारतीय शुगर’चे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी तावरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
श्री. तावरे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवी कारकीर्दीमध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांना भारतीय शुगर तर्फे Best Chief Chemist हा पुरस्कारही मिळालेला आहे व मागील वर्षी TASO INTERNATIONAL तर्फे LEADERSHIP AWARD मिळालेला आहे.
ते DSTA चे Elected Council Member आहेत व साखर ऊद्योग टास्क फोर्स कमिटीचे Council Member आहेत. त्यांनी गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी कोल्हापूर येथे सलग दहा वर्षे चिफ केमिस्ट म्हणुन कामकाज केले आहे व गुरुदत्त शुगर्सची रिकव्हरी सलग पाच वर्ष देशात एक नंबर ठेवण्यात यश मिळविले .
सीझन 2015 -16 मध्ये 13.62 रिकव्हरीचा विक्रम गुरुदत्त शुगर्सच्या इतिहासात प्रस्थापित केला व तो आतापर्यंत मोडला गेला नाही. त्यांनी 55 ते 60 ICUMSA ची बोल्ड ग्रेन साखर उत्पादन करुन एक विक्रमही प्रस्थापित केला. शुगर हाऊसचे माॅडिफिकेशन करुन एकाच New Long Japan मशीन वर 8400 qtls शुगर बॅगिग अगदी कमी लेबर वर करुन 5700 क्रशिंग करणेचा विक्रमदेखील तावरे यांनी प्रस्थापित केला आहे.
त्यानंतर त्यांनी श्री दत्त दालमिया शुगर, आसुर्ले पोर्ले येथे सरव्यवस्थापक (उत्पादन) या पदावर काम केले व तेथेही शुगर क्वालिटी सुधारणेसाठी व रिकव्हरी एक नंबरवर (12.72 ते 13.41) नेण्यासाठी खूप मेहनत घेतली. सध्या दालमिया शुगरची रिकव्हरी सलग सात वर्षापासून देशात एक नंबरवर आहे.
भारत तावरे सध्या श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ग्रुप प्रोडक्शन हेड म्हणुन चार कारखान्यांचे कामकाज पाहत आहेत. त्यांनी वसंतदादा स.सा. कारखान्या सारख्या बंद पडलेल्या जुन्या कारखान्यामध्ये सुध्दा 45 ते 50 ICUMSA ची साखर उत्पादन करण्याची महनीय कामगिरी बजावली आहे.
साखरवाडी (फलटण) जुना बंद पडलेला साखर कारखान्यात FFE VKT, Honeycomb design Pan FBD, Electromak resonance Hopper, MCS, DBF IER BRS या सारखे नवीन तंत्रज्ञान वापरुन white Lustre Refine Sugar चे उत्पादन मागील वर्षांपासून सुरु केले आहे.
सध्या कांडला (गांधीधाम, गुजरात) येथे Honeycomb design Pan, Rotary drier, FBD Electromak resonance Hopper MVR ( without Boiler steam) BRS, LTE ATFD असे नव तंत्रज्ञान वापरुन Raw Sugar पासून 25 ते 30 ICUMSA ची Lustre White Refine Sugar चे उत्पादन सुरु केले आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला Bhartiya Sugar, STA, STAI चे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!