भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग

पुणे: पाटस (ता. दौंड) येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला सोमवारी (ता. ३०) सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. दोन अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व संबंधित यंत्रणांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रक पूर्णपणे जाळून खाक झाला व बगॅस ही खाक होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण काय, याबाबत तपास सुरू आहे.





