भोगी सण

आज सोमवार, जानेवारी १३, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २३ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२०
चंद्रोदय : १७:४७ चंद्रास्तचंद्रास्त नहीं
शक सम्वत : १९४६ क्रोधी
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – ०३:५६, जानेवारी १४ पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – १०:३८ पर्यंत
योग : वैधृति – ०४:३९, जानेवारी १४ पर्यंत
करण : विष्टि – १६:२६ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०३:५६, जानेवारी १४ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : मिथुन – ०४:१९, जानेवारी १४ पर्यंत
राहुकाल : ०८:३८ ते १०:०१
गुलिक काल : १४:१० ते १५:३४
यमगण्ड : ११:२४ ते १२:४७
अभिजितमुहूर्त : १२:२५ ते १३:०९
दुर्मुहूर्त : १३:०९ ते १३:५४
दुर्मुहूर्त : १५:२३ ते १६:०७
वर्ज्य : २२:२७ ते ००:०२, जानेवारी १४
भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. हा सण मार्गशीर्ष महिन्यात येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हे सहसा १३ अथवा १४ जानेवारी रोजी साजरे केले जाते. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.
करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.
आज भोगी सण आहे.
नाट्य कलाकार प्रभाकर पणशीकर –
’तो मी नव्हेच’ – १५ ऑगस्ट १९६२ ला ’तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि कीर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ने मिळवून दिली.
१३ मार्च १९५५ ह्या दिवशी “राणीचा बाग” नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत” या नावाने ओळखले जात असत; वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या “नाट्यनिकेतन” या संस्थेत प्रवेश केला आणि “कुलवधू”,“भूमिकन्या सीता”,“वहिनी”,“खडाष्टक” अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
पंतांनी आणखीन ज्या नाटकांमध्ये अभिनय केला ती नाटकं म्हणजे “अश्रुंची झाली फुले”,“थँक यु मि. ग्लाड”,“जेव्हा गवताला भाले फुटतात”,“भटाला दिली ओसरी”; तर “संगीत मदनाची मंजिरी”,“संगीत सुवर्णतुला”,“अंधार माझा सोबती”,“किमयागार”,“पुत्रकामेष्टी” या सारख्या गद्य व संगीत नाटकांची निर्मिती केली.
याशिवाय पणशीकरांनी मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही आपल्या अभिनयाची प्रतिभा दाखवुन दिली.नाटकांसोबतच ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका आणि आकाशवाणीसाठी असंख्य नाट्यवाचने केली.
पणशीकरांनी नाट्य तसंच चित्रपट क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित कराण्यात अले होते. महाराष्ट्र शासनाच्या जीवन गौरव पुरस्काराचे ‘प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले.
• २०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च, १९३१)
गायिका प्रभा अत्रेंना १९४८ ते १९५३ पर्यंत सुरेशबाबूंकडून किराणा घराण्याची पद्धतशीर तालीम मिळाली. त्यांना सुरेशबाबूंच्या आकस्मिक निधनानंतर १९५५ ते १९५७ पर्यंत त्यांच्या भगिनी व ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना १९५५ साली केंद्र सरकारने शास्त्रीय संगीतासाठी जाहीर केलेली शिष्यवृत्ती मिळाली. पुढे १९५७ नंतरची त्यांची वाटचाल स्वचिंतनातून झाली. अमीर खाँ आणि बडे गुलाम अली खाँ यांच्या गायकीने त्यांना एक वेगळी नवी वाट दाखविली.
प्रभा अत्रे यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या ‘ संगीत अलंकार’ आणि ‘संगीत प्रवीण’ या पदव्या प्राप्त केल्या आहेत तसेच ट्रीनीटी कॉलेज ऑफ लंडन येथून त्यांनी वेस्टर्न म्युझिक थिअरी या विषयातही अभ्यास पूर्ण केला आहे. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून बी.एस्सी., कायदा महाविद्यालयामधून एलएल.बी. आणि बार काउन्सिल अशा पदव्या मिळविल्या. शिक्षण चालू असताना प्रभा अत्रेंनी मैफलींबरोबरच काही काळ संगीत नाटकांमधूनही मुख्य भूमिका केल्या.
‘संगीत शारदा’, ‘विद्याहरण’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ इ. नाटकांमधून त्यांना नावाजलेल्या नटांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण तिथे त्यांचे मन फार काळ रमले नाही. त्यांना संगीतच भावले होते आणि मुख्य म्हणजे आकाशवाणीत अचानक नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी संगीतात करिअर करायचे ठरवले. आकाशवाणीत साहाय्यक संगीत निर्माता म्हणून त्यांनी १९६० ते १९७० पर्यंत काम केले आहे. त्यानंतर त्यांनी १९७९ ते १९९२ पर्यंत मुंबईच्या श्री.ना.दा.ठा. महिला विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणूनही काम केले.
प्रभा अत्रेंचे गाणे शांत, गंभीर, भावनेने ओथंबलेले व अतिशय बुद्धीप्रधान आहे. मींड आणि स्वरकणांचा विपुल प्रयोग, भावपूर्ण स्वर लगाव, शब्दांचे स्पष्ट सांगीतिक उच्चार, आलाप, ताना, सरगम मधील लालित्य, वैविध्य आणि नाविन्य सामान्य श्रोत्यालाही जाणवावे. कर्नाटक संगीतातील गमक आणि सरगम या माध्यमांतून हिंदुस्थानी संगीताला अधिक समृद्ध करण्यात प्रभा अत्रे यांचे मोठे योगदान आहे.
प्रभा अत्रेंच्या ठुमरीनेही आपले वेगळेपण प्रस्थापित केले आहे. पूरब आणि पंजाबी अंगाची त्यांची अभिजात ठुमरी जशी खानदानी आहे, तशीच ती रसिली आणि नखरेलही आहे. ख्याल आणि ठुमरी तेवढ्याच ताकदीने गाण्यातदेखील अत्रे यांचे नाव अग्रणी आहे.
प्रभा अत्रेंनी अनेक बंदिशी रचल्या आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये स्त्री-रचनाकार तशा नगण्य आहेत. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात त्यांचे ‘स्वरांगिनी’ हे बंदिशींचे पुस्तक महत्त्वाचे होय. ख्याल, तराणा, चतुरंग, टप्पा, ठुमरी, दादरा, भजन, गीत, गझल अशा वेगवेगळ्या संगीत प्रकारांत त्यांनी रचना केल्या आहेत. काही बंदिशींना कर्नाटकी स्पर्श झाल्यामुळे त्यांचे माधुर्य अधिकच वाढले आहे. ‘स्वरांगिनी’ आणि ‘स्वरंजनी’ या रचनांच्या पुस्तकांमध्ये एकूण जवळजवळ साडेचारशे बंदिशी आहेत. या दोन्ही पुस्तकांचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे. आज अनेक कलाकार त्यांच्या बंदिशी गात आहेत. एवढेच नाही, तर नृत्य आणि जॅझ संगीतासाठीही त्यांचा वापर केला जात आहे.
गुरु-शिष्य परंपरा आणि विद्यापीठीय शिक्षण यांच्या समन्वयातून त्यांनी पुण्याला ‘स्वरमयी गुरुकुल’ची स्थापना केली आहे. इथे संगीताचे सर्वांगीण शिक्षण दिले जाते. याचबरोबर तरुण, गुणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मासिक मैफली आयोजित केल्या जातात. अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांमधून त्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध समित्यांवरही त्यांची नेमणूक झाली आहे.
राग-रस, राग-समय-बंदिशीची लांबी आदी रूढींना काहीसे छेद देणारे विचार त्यांनी वेळोवेळी प्रकट केले आहेत. परंपरेच्या चौकटीत राहूनही त्यांनी नाविन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
देशातील एक ज्येष्ठ गायिका, रचनाकार, चिंतनकार, लेखिका आणि गुरू अशा विविध भूमिकांमधून प्रभा अत्रेंचे कार्य जनतेसमोर आले आहे. भारत सरकारने त्यांना १९९० साली ‘पद्मश्री’ व ‘२००२ साली पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या संगीत विषयक कर्तृत्वाचा गौरव केला आहे. तसेच, मध्य प्रदेश शासनाचा ‘कालिदास सन्मान’, १९९१ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, असे इतर राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत.संकेश्वर येथील शंकराचार्य यांच्याकडून त्यांना “गान प्रभा” असा सन्मान मिळाला आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध अशा “सवाई गंधर्व -भीमसेन संगीत महोत्सवाची’ सांगता करण्याचा मान ज्येष्ठ गायिका म्हणून प्रभा अत्रे यांना मिळाला आहे.
• २०२४ : ‘ पद्मभूषण ’ पुरस्कार सन्मानित किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे निधन ( जन्म : १३ सप्टेंबर, १९३२ )
- घटना :
१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.
१९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.
१९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.
१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.
१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
• मृत्यू :
• १९७६: ‘पद्मभूषण’ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.
• १९८५: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.
• १९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल, १९१२)
• १९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.
• २००१: संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.
• २०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)
- जन्म :
१९१९: आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर, १९९६)
१९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल, २००९)
१९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.
१९४८: जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.
१९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.