बिद्री कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चार महिन्यांनी, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सहकार विभागाने याबाबत आदेश काढला काढला आहे.

K P patil

पावसाचे कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार दि. २ जून पर्यंतची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे, त्याच टप्प्यावर ती ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवावी, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. दरम्यान, या आदेशाला आपण न्यायालयात आव्हान देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी म्हटले आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत १० ऑक्टोबर २०२२ रोजी संपली. त्यामुळे प्राधिकरणाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार एप्रिलला प्रारूप व १७ मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली.

त्यानंतर १२ जून ते ९ जुलै असा निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम तयार केला होता. या कालावधीत परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. निवडणूक कालावधीत पावसामुळे अर्ज सादर करणे, माघारी घेणे, प्रचार यंत्रणा व त्यापुढे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असे सहकार विभागाच्या आदेशात म्हटले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »