छत्रपती कारखान्यात होणार ‘काका-पुतण्या’ सामना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर कारखानदारीत आदर्श निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आणि इंदापुरातील सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असा पॅनल उभा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये रंगत येणार असून खऱ्या अर्थाने जनता कोणाच्या हातात कारखान्याची धुरा देणार आहे हे समजेल. मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा छत्रपती सहकारी साखर कारखाना असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच हे मोठे आव्हान असणार आहे.

पवार परिवारात फूट पडल्यानंतर मोठी राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे. यातील पहिल्या मालिकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली. बारामती लोकसभा मतदारसंघा मध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला.

इथून पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन येथून पुढील होणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये पूर्णपणे ताकतीने पॅनल तयार करून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे येऊ घातलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष मोठ्या ताकतीने निवडणूक साठी उतरणार असून या पक्षाच्या माध्यमातून छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

आज पर्यंत या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावून देखील हा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात राहिला आहे. मात्र काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय चित्र बदलले असून इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून राजकीय गणिते आखली जाणार असून पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढविले जाणार असल्याने येणारी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी होणार नसून या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनल मध्ये खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार यांच्या उपस्थितीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा पॅनल तयार करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्या वेळपासूनच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय वातावरणामध्ये बदल झालेला असून येणाऱ्या काळामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही नक्कीच ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »