लेखक विष्णू डे
आज मंगळवार, डिसेंबर ३, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १२, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५७ सूर्यास्त : १८:००
चंद्रोदय०८:४७ चंद्रास्त१९:४६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १३:०९ पर्यंत
नक्षत्र : मूळ – १६:४२ पर्यंत
योग : शूल – १५:०८ पर्यंत
करण : कौलव – १३:०९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०१:१२, डिसेंबर ०४ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १५:१४ ते १६:३७
गुलिक काल : १२:२८ ते १३:५१
यमगण्ड : ०९:४३ ते ११:०६
अभिजितमुहूर्त : १२:०६ ते १२:५१
दुर्मुहूर्त : ०९:०९ ते ०९:५४
दुर्मुहूर्त : २३:११ ते ००:०३, डिसेंबर ०४
अमृत काल : १०:०३ ते ११:४२
वर्ज्य : १५:०२ ते १६:४२
वर्ज्य : ०२:३१, डिसेंबर ०४ ते ०४:०९, डिसेंबर ०४
शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून जागतिक अपंग दिन या दिवसाची योजना आहे. अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते.
दशकअखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला ‘अपंग दिन’ साजरा झाला होता.
आज जागतिक अपंग दिन आहे.
३ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळमध्ये यूनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती.
यात अधिकृतपणे ३७८७, तर अनधिकृत आकड्यानुसार, आठ ते दहा हजार निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर जागीच मरण पावणाऱ्यांची संख्या तीन हजारच्या घरात होती, तर पुढील पंधरा दिवसांत आणखी सुमारे आठ हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आत्तापर्यंत आणखी आठ हजार लोकांना या गॅसमुळं झालेल्या विविध विकारांमुळं प्राणाला मुकावं लागलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, तेव्हा पाच लाख ५८,१२५ लोक या वायुगळतीने बाधित झाले. त्यापैकी ३८,४७८ जणांना कायमस्वरूपी किरकोळ व्यंग निर्माण झालं, तर सुमारे ३९०० जणांना कायमस्वरूपी गंभीर व्यंग शरीरात निर्माण झालं. या दुर्घटनेत नेमके किती लोक मृत्यू पावले आणि किती जखमी वा बाधित झाले, याविषयी आजवर वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले गेले. ह्या वायूमुळे गुरांनाही बाधा झाली.
भारत सरकारनं १९८५ मध्ये अमेरिकी कोर्टात युनियन कार्बाइडविरुद्ध ३.३ अब्ज डॉलर भरपाईचा दावा लावला. शेवटी १९८९ मध्ये भारत सरकार आणि युनियन कार्बाइड यांच्यात कोर्टाबाहेर समझोता झाला आणि भारत सरकारनं अवघ्या ४७ कोटी डॉलर भरपाईवर समाधान मानलं. !
आज भोपाळ वायू गळती दुर्घटना दिन आहे.
१८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)
- लेखक विष्णू डे : कोलकात्याच्या मित्रा इन्स्टिट्यूट आणि संस्कृत कॉलेजिएट स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९२७ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यानंतर इंग्रजी विषय घेऊन सेंट पॉल कॅथेड्रल मिशनच्या कॉलेजमधून ते बी. ए. झाले. कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी विषयात त्यांनी एम.ए. केलं आणि अनेक कॉलेजातून इंग्रजीचे अध्यापन केले.
शाळेत असतानाच त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यांची एकूण ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची सुरुवातीची एक कथा होती. ‘पुरूणेर पुनर्जन्म या लक्ष्मण’ ही कथा प्रगती या ढाक्यातून प्रकाशित होणाऱ्या साहित्यविषयक नियतकालिकात १९२८ मध्ये प्रसिद्ध झाली होती. १९३१ मध्ये परिचय या नियतकालिकाच्या च्या पहिल्या अंकात त्यांच्या दोन कविता प्रसिद्ध झाल्या.
सुरुवातीच्या विष्णू डे यांच्या कवितांपेक्षा १९५० नंतरची त्यांची कविता वेगळी आहे. अधिक मुक्त तरीही संयत, पारदर्शी अशी आहे. कोमल गान्धार, आलेख्य, स्मृति सत्ता भविष्यत्, उत्तरे भाको मौन या संग्रहांतील कवितांतून त्यांचे द्रष्टेपण उठून दिसते. तसेच सभोवतालच्या समाजातील अनिष्ट रूढी, रीतीरिवाज यातील टोचणारा पोकळपणा, व्यंग, विडंबनाच्या रूपात व्यक्त झाला आहे.
ऑफेलिया क्रेसिडा या कवितेत मानवी असहाय्यतेचे, दुभंगलेल्या मन:स्थितीचे चित्रण आहे. ‘घुडीस्वार’ ही त्यांची एक सुरेख प्रतिकात्मक कविता आहे.
‘घुडीस्वार’ ही त्यांची एक सुरेख प्रतिकात्मक कविता आहे. घोडीच्या धावत्या टापातून ध्वनित होणारी गती व ताण त्यांनी विलक्षण तन्मयतेने शब्दबद्ध केला आहे. पूर्वलेख या संग्रहातील ‘जन्माष्टमी’ कवितेत कोलकाता महानगरीचे एक संवेदनशील पण विदारक रेखाचित्र आहे.
रूची ओ प्रगती, साहिलेर भविष्यत्, एलो मेलो जीवन ओ शिल्पसाहित्य हे त्यांचे निबंध आणि समीक्षालेखांचे सहा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. बंगालीप्रमाणेच इंग्रजीमध्येही त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. शेक्सपिअर, गटे, शेली, बाँदलेअर, एलियट, पास्तरनाक, गार्शिया, ब्रेख्त अशा साठहून अधिक देशोदेशीच्या कवींच्या कवितांचे त्यांनी बंगालीत अनुवाद केले आहेत. व्यापक व्यासंग, सतत चिंतन, मनन, जगभरच्या ज्ञानाची ओढ, चौफेर निरीक्षण, मानवतेवर असलेली दृढ श्रद्धा या साऱ्याचं दर्शन त्यांच्या कवितेत दिसते. संथाळी व छत्तीसगढी लोकगीते, बंगाली मंगल काव्यातील बारमासिया व नवकविता यांचा मिलाफ त्यांच्या कवितेत दिसतो.
मार्क्सवादी विचारसरणीच्या विष्णूजींनी सामाजिक जागृती करण्यासाठी पत्रिकाही प्रकाशित केली. कल्लोळ या मासिकाच्या युवा कवींच्या ग्रुपचे ते १९२०-३० च्या दरम्यान सदस्य होते. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अनेक सन्माननीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत- साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), नेहरू स्मृती पुरस्कार (१९६७), सोव्हिएट लँड पुरस्कार (१९७१) ज्ञानपीठ पुरस्कार (१९७१) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
१९८२ : बंगाली भाषेचे महत्त्वपूर्ण कवी, गद्यलेखक, अनुवादक आणि कला समीक्षक, विष्णू डे यांचे निधन ( जन्म : १८ जुलै, १९०९ )
- घटना :
१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले. - मृत्यू :
• १९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
• १९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. ( जन्म: १९ मे , १९०८)
• १९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट , १९०५)
• २०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर, १९२३)
• २०२० : देशातील नामांकित मसाला कंपनी महाशय दी हट्टी अर्थात एमडीएचचे प्रमुख पद्मभूषण पुरस्कार सन्मानित महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. - जन्म :
१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर, १८११)
१८८२: जगविख्यात चित्रकार पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित नंदलाल बोस यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल , १९६६)
१८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट, १९०८)
• १८९२: कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर, १९५८)
१८९४: भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च , १९७५)
१९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर, २००३)