इथेनॉल मिशनचा जागतिक साखर बाजारावर परिणाम – BMI अहवाल
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिशनमुळे आगामी काही भारतीय साखर उद्योगाचे आंतरराष्ट्रीय साखर निर्यात बाजारपेठेतील स्थान घसरणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
फिच सोल्युशन्सच्या युनिट बीएमआय या संशोधन संस्थेने तयार केलेल्या एशिया बायोफ्युएल आउटलुकच्या अहवालानुसार, क्रूउ तेल उत्पादनांचे आयात बिल कमी करण्याचा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा पर्याय म्हणून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्याची भारताची मोहीम पुढे आणखी विस्तारणार आहे. त्यामुळे भविष्यात साखर उत्पादन कमी होत जाईल.
यूएस डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर (USDA) नुसार, भारताचे इथेनॉल मिश्रण 12.5% पर्यंत पोहोचले आहे, तर देशाचे सरकारचे लक्ष्य 2025 पर्यंत 20% पर्यंत पोहोचण्याचे आहे.
अहवालात म्हटले आहे की, 2025 पर्यंत भारत हे साध्य करू शकेल हे की नाही याबाबत शंकाच आहे.
BMI ने नमूद केले आहे की, इंडोनेशियादेखील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात सुरुवातीला 5% मिश्रण करत आहेत, त्याचे लक्ष्य 2030 पर्यंत 10% पर्यंत पोहोचण्याचे आहे. मात्र त्याचा जागतिक साखर बाजारपेठेवर परिणाम होणार नाही. याउलट भारताची स्थिती आहे, कारण भारत जगातील प्रमुख साखर उत्पादक देश आहे..