‘शेतीचे कायदे’ सर्वांसाठी उपयोगी पुस्तक
शेतजमीन कायद्याबाबतच्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तरे
वीकेंड विशेष
पुणे : नामवंत सनदी अधिकारी शेखर गायकवाड (IAS) यांनी शेतकरी बांधवांसाठी लिहिलेले ‘शेतीचे कायदे’ हे पुस्तक सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे. शेत जमिनीसंदर्भात आपल्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांना या पुस्तकात उत्तरे मिळतात.
उदा. सातबारा कसा वाचायचा, तुकडेबंदी, फेरफार नाही केल्यास काय होते, शेत जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार कसे होतात इत्यादी….
या पुस्तकात शेत जमिनीचे कायदे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. किमान साक्षर व्यक्तीलाही हे पुस्तक समजते. सर्वांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक शुगरटुडेच्या वाचकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहोत.
‘शेतीचे कायदे’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारदेखील मिळाला. वाङ्मय प्रकारात अशा पुस्तकाला पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतीय प्रशासन सेवेत आपली वेगळी छाप पाडणारे श्री. गायकवाड यांनी आजवर ३० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. प्रामुख्याने शेती आणि ग्रामीण माणूस हाच वाचक केंद्रस्थानी ठेवून सर्व पुस्तके लिहिली आहेत.
पुस्तकाची मूळ किंमत – रू. ३८०/-
शुगरटुडे न्यूज मॅगेझीनच्या (sugartoday.in) वाचकांसाठी सवलत – १० टक्के
तीन किंवा तीनपेक्षा अधिक पुस्तके खरेदी केल्यास २० टक्के सवलत.
पुस्तके घरपोच पाठवण्यात येतील.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या खालील विक्रमी खपाची पुस्तके मिळवण्यासाठी 8999776721 या क्रमांकावर whatsapp वरून संपर्क साधावा.
काही पुस्तकांची नावे
- एफआरपी म्हणजे काय? – रू. 5०
- शेतकऱ्यांनो सावधान – रू. ३०
- जमीन व्यवहार नीती – रू. १७०
- फेरफार नोंदी – रू. २२०
- प्रशासनाच्या नव्या वाटा – रू. ४००
- स्पर्धेच्या पलीकडे – रू. २००
- महाराष्ट्राची भूजल गाथा – रू. २५०
- (शंभर रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या पुस्तकावर दहा टक्के सुट. एक हजार पेक्षा अधिक रकमेची खरेदी केल्यास २० टक़्के सूट- HOME DELIVERY)