आज बुद्ध पौर्णिमा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, मे १२, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २२, शके १९४७
सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०५
चंद्रोदय : १८:५५ चंद्रास्त : चंद्रास्त नहीं
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पौर्णिमा – २२:२५ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – ०६:१७ पर्यंत
योग : वरीयान् – ०५:५३, मे १३ पर्यंत
करण : विष्टि – ०९:१५ पर्यंत
द्वितीय करण : बव – २२:२५ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : तूळ – ०२:२७, मे १३ पर्यंत
राहुकाल : ०७:४३ ते ०९:२०
गुलिक काल : १४:१२ ते १५:५०
यमगण्ड : १०:५७ ते १२:३५
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १३:०१ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:३७ ते १६:२९
अमृत काल : २३:१८ ते ०१:०५, मे १३
वर्ज्य : १२:३३ ते १४:२१

देवांनी आणि दैत्यांनी समुद्रमंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले. आपाआपसातले मतभेद विसरून देव-दैत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्न केला. परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला. शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप-कूर्मावतार-धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला. कूर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्र मंथन शक्य झाले. ही घटना ज्या दिवशी घडली त्या वैशाख पौर्णिमेला कूर्म जयंती साजरी होते.

आज कूर्म जयंती आहे.

भृगु : एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा. कृत्रिम रीत्या अग्नी निर्माण करण्याचा शोध प्रथम याने लावला, असे उल्लेख आढळतात. ‘अग्नीचा आवाज’ वा ‘ज्वाला’ या अर्थाच्या ‘भृग्’ या संस्कृत शब्दापासून तसेच भ्रस्ज (भाजणे), भृज (भाजणे) वा भ्राज् (प्रकाशणे) या संस्कृत धातूंपासून हा शब्द बनल्याचे सांगितले जाते. प्रजापतीच्या अग्नीत पडलेल्या वीर्यापासून त्याचा जन्म झाल्यामुळे त्याला अग्नीज हे नाव मिळाल्याची कथा आढळते. कून आणि बार्थ याच्या मते भृगू म्हणजे विद्युत्देवता, तर बर्गेनीच्या मते भृगू म्हणजे अग्नी होय.

आज भृगुजयंती आहे . (एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा)

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. म्हणुन ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.

बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.
ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

आज बुद्ध पौर्णिमा आहे.

१२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.

आज जागतिक परिचारिका दिन आहे.

ईंद्रा देवी तथा युजेनी व्ही. पीटरसन – या रशियन योगशिक्षिका होत्या.

यांचे वडील व्हासिली पीटरसन हे स्वीडिश बँक चालक होते तर आई अलेहांद्रा लाबुनस्कैया या रशियन जहागिरदार घराण्यातील होत्या १९१७मधील बोल्शेविक क्रांती दरम्यान ईंद्रा देवी आपल्या कुटुंबासह बर्लिनला पळून आल्या. तेथे त्यांनी नृत्य आणि अभिनयाचे शिक्षण घेतले.

या रवींद्रनाथ टागोर आणि योगी रामचरक यांच्या पुस्तकांनी प्रभावित झालेल्या होत्या. १९२७ साली या भारतात आल्या व भारतीय टोपणनाव धारण करून येथील चित्रपटांत त्यांनी कामे केली. १९३०मध्ये त्यांनी भारतातील चेकोस्लोव्हाकियाच्या राजदूत यान स्ट्राकाटी यांच्याशी लग्न केले.

मैसूरच्या महाराजांनी भलावण केल्याने योगगुरू तिरुमलई कृष्णमाचार्य यांनी ईंद्रा देवी यांना शिष्य मानले.

१९३९ साली या आपल्या पतीबरोबर चीन येथे गेल्या. तेथे त्यांनी च्यांग कै शेक यांच्या घरी योगासने शिकविण्याचा वर्ग सुरू केला. १९४९ साली स्ट्राकाटी यांचे निधन झाल्यावर ईंद्रा देवी अमेरिकेस गेल्या व तेथेही त्यांना योगासनाचे वर्ग सुरू केले. त्यांच्या शिष्यांमध्ये ग्रेटा गार्बो, यहूदी मेनुहिन, ग्लोरिया स्वान्सन यांसह हॉलिवूडमधील अनेक व्यक्तींचा समावेश होता.

१९५३मध्ये त्यांनी सिगफ्रीड कनौअर यांच्याशी लग्न केले. त्यानंतर अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारताना त्यांनी ईंद्रा देवी हे नाव लावले.

ईंद्रा देवी पुट्टपार्थीच्या सत्य साई बाबा यांच्या कार्याशी संलग्न होत्या.

१९८२ साली ईंद्रा देवी आर्जेन्टिनाला स्थलांतरित झाल्या. तेथे २००२ साली त्यांचा मृत्यू झाला.

१८९९: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल ,२००२)

  • घटना :

१३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
१५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
१६६६: आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली.
१७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
१९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
१९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 सादर केले.
१९५२: प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
१९६५: सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
१९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
२००८: चीनमध्ये ८.० पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात ६९,००० पेक्षा जास्त लोक मारले गेले.

• मृत्यू :

२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट, १९३४)

  • जन्म :

१९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक श्री
आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी, १९८३)

१९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर, १९९३)
१९३० : लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचा जन्म ( मृत्यू : १३ मे, २०१० )

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »