आता आली मिथेनॉलवर चालणारी बस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बेंगळुरू : इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर, आता डिझेलमध्ये मिथेनॉलचे मिश्रण करून वाहनांसाठी वापरण्याचा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे.

मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये सोमवारी झाले. मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC), NITI आयोग, इंडियन ऑइल कंपनी (IOC) आणि अशोक लेलँड यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.

BMTC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की MD15 (15% मिथेनॉल असलेले डिझेल) बसची पायलट चाचणी विधान सौध (कर्नाटकची विधानसभा) येथून संध्याकाळी 5:30 वाजता सुरू झाली. गडकरी यांनी बसला हिरवा झेंडा दखवला. चाचणी प्रकल्पाचा भाग म्हणून मिथेनॉल इंधन वापरणाऱ्या 80 बसेस सुरू करण्याचा BMTCचा मानस आहे आणि पहिल्या टप्प्यात अशोक लेलँडच्या 20 बसेसही सुरू केल्या जातील. या प्रयोगाचा भाग म्हणून इंडियन ऑइल कंपनी तीन महिन्यांसाठी मोफत इंधन आणि मिथेनॉल देणार आहे.

मिथेनॉल म्हणजे काय?
कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजनच्या अभिक्रियातून मिथेनॉल तयार केले जाऊ शकते, या तिन्ही वायूंना ‘सिनगॅस’ देखील म्हणतात. नैसर्गिक वायू, कोळसा किंवा बायोमास यांसारख्या विविध स्त्रोतांपासून सिनगॅस तयार केले जाऊ शकतात.

मिथेनॉल गॅसोलीनमध्ये मिसळले जाऊ शकते किंवा सुधारित इंजिन असलेल्या वाहनांमध्ये स्वतंत्र इंधन म्हणून देखील वापरले जाऊ शकते. याचे उच्च ऑक्टेन रेटिंग आहे, याचा अर्थ ते इंजिनची कार्यक्षमता सुधारू शकते आणि हानिकारक उत्सर्जन कमी करू शकते. त्यामुळे प्रदूषण कमी होते.

.यावेळी गडकरी म्हणाले, की देशातील बहुतेक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांवर तोट्याचे मोठे ओझे आहे. मात्र मिथेनॉलमुळे सार्वजनिक वाहतूक यंत्रणा, जसे की महामंडळे वा सरकारी कंपन्या, या फायद्यात येऊ शकतात. कारण मिथेनॉलचा दर प्रति लिटर २५ रुपये आहे. सरकार इथेनॉलप्रमाणेच, मिथेनॉल प्रकल्पाकडेही अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »