सी हेवी मोलॅसेसपासून उत्पादित इथेनॉलच्या दरात अल्प वाढ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी संपणाऱ्या २०२४-२५ कालावधीसाठी सी हेवी मोलॅसेसपासून बनवलेल्या इथेनॉलचा दर १.६९ रुपयाने वाढवून ५७.९७ रुपये प्रति लिटर करण्यास बुधवारी मान्यता दिली.

बी हेवी मोलॅसेसपासून आणि उसाच्या रस/साखर/साखर सिरपपासून बनवलेल्या इथेनॉलच्या किमती अनुक्रमे ६०.७३ रुपये प्रति लिटर आणि ६५.६१ रुपये प्रति लिटर अशा कायम ठेवल्या आहेत.

मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने घेतलेल्या निर्णयाची घोषणा करताना, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, की इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) २०२४-२५ साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी (OMCs) इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य २०३० च्या पूर्वीच्या उद्दिष्टापेक्षा २०२५-२६ पर्यंत अलीकडे आणले आहे.

“या दिशेने एक पाऊल म्हणून, ओएमसी चालू ईएसवाय २०२४-२५ दरम्यान १८ टक्के मिश्रण साध्य करण्याची योजना आखत आहेत,” असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

या दरवाढीचे उद्योग क्षेत्राने स्वागत केले आहे, मात्र त्याचबरोबर आमची मागणी पूर्णपणे मान्य झाली नाही, असा सूर काढला आहे. तिन्ही प्रकारच्या इथेनॉलच्या दरात वाढ करावी, सिरपपासून इथेनॉलचा दर रू. ७१ करावा, अशी उद्योगाची मागणी होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »