सी. एन. देशपांडे : वाढदिवस शुभेच्छा

साखर उद्योग विश्वातील अत्यंत अभ्यासू आणि समर्पित म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे व्यक्तिमत्त्व जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट श्री. सी. एन. देशपांडे यांचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
श्री. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. साखर विश्वातील अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून त्यांचा आदर्श व्यक्तिमत्त्व उल्लेख होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली जयवंत शुगर्सलाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
श्री. देशपांडे यांना पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!





