उसाच्या फडात गांजाची शेती उघडकीस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदेगाव (ता. लातूर) शिवारात छापा टाकून उसाच्या फडात लपवून ठेवलेली गांजाची लागवड शोधून काढली. या कारवाईत तब्बल १०८ गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजकुमार छत्रभुज देशमुख (वय ५६) हा आपल्या शेतात उसाच्या आडोशाला गांजाची लागवड करत होता.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने गट क्रमांक १३२ मध्ये छापा टाकला. या छाप्यात ३४ किलो ८०५ ग्रॅम वजनाचे गांजाचे झाडे आढळले.

जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५ लाख २२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »