केंद्राकडून नोव्हेंबरसाठी साखरेचा कोटा जाहीर

पुणे : दर महिन्यासाठी केंद्र सरकार हे साखरेचा कोटा खुला करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने नुकताच नोव्हेंबरसाठी साखरेचा २० लाख टनाचा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे बोलले जाते. अपेक्षेप्रमाणे या महिन्यात दोन लाख टन साखरेचा कोटा कमी देण्यात आला आहे. यामुळे कदाचित साखरेच्या निविदा उंचावणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या सर्व नोव्हेंबर महिन्यासाठी किमान २२ लाख लाख टन साखर कोटा खुला होण्याची अपेक्षा होती. लग्नसराईमुळे साखरेला चांगली मागणी अपेक्षित आहे. त्या तुलनेत कोटा अपुरा असल्याने दरात क्विंटलमागे २५ ते ५० रुपयांनी वाढ अपेक्षित आहे. सध्या साखरेच्या निविदा ३८०० रुपये दराने जात आहेत. नोव्हेंबरच्या निविदांना सुरुवात होताच साखर दरात तेजीचा अंदाज साखर उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.






