केंद्र सरकारचे साखर कारखान्यांना ५१७६ कोटी
मुंबई : इथेनॉलचे नवीन प्रकल्प सुरू करणे व सध्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील 52 साखर कारखाने व ‘स्टँड अलोन’ एकल इथेनॉल कंपन्यांना केंद्राने 5176 कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. त्यात खासगी आणि सहकारी अशा दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे.
सर्वाधिक कर्ज एनएसएल शुगर लि. या कंपनीला मंजूर झाले आहे. ही रक्कम सुमारे २४८ कोटी आहे. न्यूजिविडू सीड्स लि.चे ही शुगर कंपनी आहे. तिचे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि ओरिसामध्ये प्रकल्प आहेत. त्याखालोखाल २४७ कोटींचे कर्ज स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लि. या कंपनीला मंजूर झाले. ही कंपनी फलटण स्थित आहे.
इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत इथेनॉल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 25 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल उत्पादन वाढवले आहे.
राज्यातील बहुतेक साखर कारखाने सध्या इथेनॉलचे उत्पादन करतात. काही कारखान्यांकडे हे प्रकल्प नाहीतर, तर काही कारखान्यांचे प्रकल्प कमी क्षमतेचे आहेत. या कारखान्यांनी केंद्राकडे कर्ज मागितले होते. केंद्राचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्यातील 52 कारखाने व कंपन्यांना 5 हजार 176 कोटी 17 लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. हे कर्ज इथेनॉल उत्पादनासाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन घटून इथेनॉल निर्मिती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, देशातील 299 कारखान्यांना हे कर्ज मंजूर झाले आहे. यामध्ये सहकारी व खासगी कारखाने आणि कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये उसापासून व धान्यापासून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.
इथेनॉल उत्पादनात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये इथेनॉल उत्पादन केले जात आहे.
कर्ज मंजूर झालेल्या कारखान्यांची यादी या प्रमाणे….