केंद्राचा एप्रिलसाठी २३ लाख टन साखर विक्री कोटा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मागणी लक्षात घेऊन वाढ

नवी दिल्ल्ली : केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी २३ लाख मेट्रिक टन साखरेचा विक्री कोटा जाहीर केला आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने २५ मार्च रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले. मार्चमधील २२ लाख टनांच्या तुलनेत हा कोटा ५० हजार टनांनी वाढवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये २३.५ लाख टनांचा कोटा देण्यात आला होता. त्याच्या तुलनेत यंदा ५० हजार टनांची घट दिसून येत आहे. उत्पादनातील चढ-उतार आणि साठ्याचा विचार करून हा समतोल साधण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने शीतपेये, आइस्क्रीम आणि रसवंतिगृहांकडून साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन केंद्राने कोटा वाढवला असून, बाजारपेठेत साखरेची उपलब्धता पुरेशी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोटा महिनाभरात विकणे बंधनकारक

कारखान्यांना हा कोटा महिनाभरात विकणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत विभागाने दिले आहेत. गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना कारखान्यांकडे मोठा साठा उपलब्ध आहे. वाढीव कोट्यामुळे कारखान्यांना रोख सुलभता मिळण्यास मदत होईल, असे केंद्रीय सूत्रांनी स्पष्ट केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »