चक्रधर स्वामी जयंती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, ऑगस्ट २५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ३, शके १९४७
सूर्योदय : ०६:२२ सूर्यास्त : १८:५९
चंद्रोदय : ०७:५८ चंद्रास्त : २०:२०
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १२:३४ पर्यंत
नक्षत्र : उत्तराफाल्गुनी – ०३:४९, ऑगस्ट २६ पर्यंत
योग : सिद्ध – १२:०६ पर्यंत
करण : कौलव – १२:३४ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०१:१०, ऑगस्ट २६ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : सिंह – ०८:२८ पर्यंत
राहुकाल : ०७:५७ ते ०९:३१
गुलिक काल : १४:१५ ते १५:५०
यमगण्ड : ११:०६ ते १२:४०
अभिजित मुहूर्त : १२:१५ ते १३:०६
दुर्मुहूर्त : १३:०६ ते १३:५६
दुर्मुहूर्त : १५:३७ ते १६:२७
अमृत काल : २०:०६ ते २१:४९
वर्ज्य : ०९:४९ ते ११:३२

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी – जसे कृता-त्रेतायुगात श्री दत्तात्रेय आणि द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहेत. लीळाचरित्र या मराठीतील पहिला चरित्रग्रंथ लीळाचरित्र याचे केंद्रबिंदू श्री चक्रधर स्वामी च आहेत. इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे

आज चक्रधर स्वामी जयंती आहे.

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते.

ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.वराह अवताराशी संबंधित अनेक गोष्टी वराह पुराणाात आहेत.मुळात हे तीन वराह होते. नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह. तिघांच्या एकत्रित काळाला वराहकाळ म्हणतात.

आज वराह जयंती आहे.

“मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदिया हर दिशा से, बहके सागर में मिलें
बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा..
मिले सुर मेरा तुम्हारा”

१९४१ : या लोकप्रिय गाण्याचे संगीतकार अशोक पत्की यांचा जन्मदिन. अशोक पत्की यांस जन्मदिन शुभेच्छा

गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते
गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील ‘आर्यन एज्युयूकेशन सोसायटी’च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.

एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.

‘प्रिया आणि मांजर’ ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये ‘वाङ्मयशोभा’ या मासिकात प्रकाशित झाली.’बाई शाळा सोडून जातात’ हे कथा लेखन, तसेच विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच ‘नवकथेचे अध्वर्यू’ हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.
इ.स. १९९६ चा साहित्य अकादमी पुरस्कार – ‘एका मुंगीचे महाभारत’ ह्या लेखनासाठी व जनस्थान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

१९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

  • घटना :
    १६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
    १८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
    १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.
    १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.
    १९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.
    १९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.
    १९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.
    १९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

• मृत्यू :

• २००१: संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे निधन.
• २००८: उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९३१)
• २०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२)

  • जन्म :

१९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)
१९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म. ( नागरिकत्व -बांगलादेशी, भारतीय, स्वीडीश )

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »