नवे साखर आयुक्त सोमवारी पदभार स्वीकारणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दोन दिवसांमध्ये (सोमवारी) पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते प्रशिक्षणासाठी मसुरी येथे आहेत.

२००८ च्या बॅचचे आयएएस असलेले डॉ. पुलकुंडवार यांची राज्य सरकारने त्यांची नुकतीच साखर आयुक्तपदी बदली केली आहे. मूळचे नांदेडचे असलेले डॉ. पुलकुंडवार हे जुलै २०२२ मध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून रूजू झाले होते.

डॉ. पुलकुंडवार यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून ते काम बघत होते. समृध्दी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रिया त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली.

निवृत्त साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कारकीर्दीत साखर उद्योगाने मोठी भरारी घेतली. त्यामुळे नव्या साखर आयुक्तांकडून साखर उद्योगाच्या खूप अपेक्षा आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »