साखर घट उतारा प्रमाणिकरणासाठी कारखान्यांना सूचना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : यंदाच्या हंगामात साखर घट उताऱ्याचे प्रमाणिकरण करण्यासाठी सर्व कारखान्यांनी विहित नमुन्यात माहिती भरण्याच्या सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्व कारखान्यांना दिल्या आहेत.

आयुक्तांनी कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३ नुसार केंद्र शासन प्रत्येक हंगामासाठी हंगाम सुरु होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना द्यावयाच्या साखर उता-यावर आधारीत रास्त व किफायतशीर ऊसदर निश्चित करण्यात येतो. राज्यातील गाळप हंगाम २०२३-२४ दिनांक ०१/११/२०२३ पासुन सुरू झालेला आहे. सदरहु हंगामाकरीता करीता केंद्र शासनाने इंग्रजी भाषेतील अधिसुचना क्र. No. 3(1)/2021-SP-I Dated 06.07.2023 अन्वये साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतक-यांना द्यावयाचा रास्त व किफायतशीर ऊसदर निश्चित करण्यात आलेला आहे. सदरहु बाबत सर्व कारखान्यांना या कार्यालयाच्या दिनांक १०/०७/२०२३ च्या परिपत्रकान्वये अवगत करण्यात आले आहे.

साखर आयुक्तालयाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचे सहकार्याने साखर घट उतारा प्रमाणिकरण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मागील दोन वर्षापासुन सदर प्रमाणिकरण करणेसाठी राज्यातील साखर कारखान्यांचे चिफ इंजिनिअर / लॅब इन्चार्ज व लॅब असिस्टंट यांना साखर उतारा घट उतारा नोंदीबाबत साखर आयुक्तालयाच्या वतीने व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांना सुचित करण्यात येते की, गाळप परवाना सॉफ्टवेअरमध्ये Diversion of sugar यामध्ये साखर घट उताराबाबतची अचूक व परिपुर्ण दैनदिन माहिती भरणा करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक ३ मधील निर्देशानुसार इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस, सिरप व बी हेवी मोलॅसेस यांच्या वापरामुळे/विक्रीमुळे साखर उता-यात आलेली घट बाबत माहितीचे संस्करण करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांना साखर घट उतारा प्रमाणिकरणाचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करता येईल, असेही पत्रात नमूद केले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »