अर्थतज्ज्ञ चंदुलाल नागिनदास वकील 

आवडल्यास ही बातमी शेअर करा


आज रविवार, ऑक्टोबर २६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०४, शके १९४७
सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:०८
चंद्रोदय : १०:३६ चंद्रास्त : २१:३२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : शरद्
चंद्र माह : कार्तिक
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ३०:०४+ पर्यंत
नक्षत्र : ज्येष्ठा – १०:४६ पर्यंत
योग : शोभन – ०६:४६ पर्यंत
करण : बव – १६:५८ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ३०:०४+ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : वृश्चिक – १०:४६ पर्यंत
राहुकाल : १६:४२ ते १८:०८
गुलिक काल : १५:१५ ते १६:४२
यमगण्ड : १२:२२ ते १३:४९
अभिजित मुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : १६:३६ ते १७:२२
अमृत काल : ३०:२०+ ते ०८:०७ on ऑक्टोबर २७
वर्ज्य :१९:४० ते २१:२७

आज आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन आहे.

महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर (श्री नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे) हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. . त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

वयाच्या १२ व्या वर्षांपासून त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाण्यास सुरुवात केली. वडिलांकडून त्यांनी पखवाज वादनाचे शिक्षण घेतले.

२६ मार्च १९५४ रोजी बाबा महाराजांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे वीणेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला. १९५० ते १९५४ या काळात बाबामहाराज यांनी लाकूड सामानाचा (फर्निचर) व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे.

१९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश अशा राज्यात कीर्तन – प्रवचनांचे शेकडो कार्यक्रम त्यांनी केले. १९७४ साली श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबई, आळंदी, पंढरपूर येथे कीर्तन महोत्सवांचे आयोजन त्यांनी केले. १९८० ते १९९९ या कालावधीत ज्ञानेश्वरीची प्रवचने त्यांनी केली. १९९८ ते २००१ या कालावधीत अमृतानुभवावर प्रवचने केली.

डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. भंडारा डोंगर, देहू , त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी त्यांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. १९८६ साली लंडन येथे हिंदीतून चार प्रवचने तसेच अमेरिकेत बोस्टन, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, आरलँडो आदी ठिकाणी १४ ज्ञानेश्वरी प्रवचने बाबामहाराजांनी केली आहेत.

२०२३ : महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचे निधन ( जन्म : ५ फेब्रुवारी , १९३६ )

अर्थ तज्ञ् चंदुलाल नागिनदास वकील – नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन विद्यालयात, तर महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षण विल्सन महाविद्यालयात झाले. मुंबई विद्यापीठात एम्. ए. च्या परीक्षेत प्रथम येण्याचा तसेच तेलंग सुवर्णपदक संपादण्याचा त्यांनी मान मिळविला (१९१८). लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून ओड्विन कॅनन (१८६१–१९३५) या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी एम्. एस् सी. ही पदवी संपादन केली.

वकील यांनी मुंबई विद्यापीठात अर्थशासात्राचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्या अध्यापकीय कारकीर्दीस प्रारंभ केला (१९२१). त्याच वर्षी त्यांनी देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची मुंबई विद्यापीठात स्थापना केली. त्याचेच पुढे ‘अर्थशास्त्र संस्थे’त रूपांतर झाले. या पदावर ते १९२७ पर्यंत होते. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.

१९२७ मध्येच महात्मा गांधींनी त्यांना भारतातील दारिद्र्याचे विश्लेषण (चिकित्सा) तसेच दारिद्र्यविरोधी उपाययोजना करण्यास सुचविले होते. वकील यांची ‘मुंबई अर्थशास्त्र संस्थेच्या संचालकपदावर नियुक्ती झाली (१९३०) हे पद त्यांनी २६ वर्षे (१९५६) सांभाळले. ‘भारतीय अर्थशास्त्र संस्थे’ च्या (इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन) अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे वकील हे पहिले व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ होत. १८४५-४६ यांदरम्यान वकील यांची भारत सरकारच्या नियोजन व विकास विभागाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. १९५२ साली भरलेल्या भारतीय कृषिअर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. १९५४ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या परराष्ट्रीय व्यवहारखात्याने वकील यांना विशेषज्ञ म्हणुन आमंत्रीत केले होते.

आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या तज्ञ समितीत (१९५६) व संयुक्त राष्ट्रपुरस्कृत औद्योगिक व्यवस्थापनविषयक तज्ञमंडळात त्यांचा समावेश होता (१९५७). १९५६ मध्ये रोम येथे भरलेल्या पहिल्या जागतिक अर्थशास्त्र परिषदेत भाग घेण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. १९५७–६० या कालावधीत कलकत्ता येथील यूनेस्को संशोधनकेंद्राचे संचालक म्हणून ते काम पाहत होते. १९६५ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इंडियाना विद्यापीठात ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून गेले होते. २२ ऑगस्ट १९६८ रोजी सुरत (गुजरात राज्य) येथील दक्षिण गुजरात विद्यापीठात त्यांची कुल गुरूपदावर नियुक्ती करण्यात आली.

उपलब्ध साधनसंपत्तीपेक्षा अधिक प्रमाणात करण्यात येणारा सार्वजनिक (सरकारी) खर्च, हे चलनवाढच्या अवस्थेचे मूलभूत कारण समजण्यात येते. वेळेत नियंत्रित केली गेली नाही, तर अर्थव्यवस्थेवर दुःसह (तीव्र) ताण पडू शकतात. चलनवाढ हा परागामी करपद्धतीचा एक प्रकार आहे. तिची तुलना चोराशी करता येईल. चोर संपत्तीची लूट वा चोरी अंधारात करतो, परंतु चलनवाढ ही दिवसाढवळ्या लूटमार करते. चोराला पकडणे शक्य असते, चलनवाढीला अटकाविणे दुर्धर असते.

शेततुकड्यांचे एकत्रीकरण, जमीनमहसुलाची पुनर्रचना, बँकिंग व्यवसायाचा विकास, कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा तसेच सामुदायिक शिक्षणप्रसार इ. विविध मार्गांचा अवलंब करून दारिद्र्याचे निवारण करणे शक्य आहे, असे वकील यांचे प्रतिपादन होते.

वकील यांनी पी. आर्. ब्रह्मानंद या अर्थशास्त्रज्ञांसमवेत १९५६ मध्ये मजुरी-अधिष्ठित वस्तु-प्रतिमान (वेज गुड्स मॉडेल) सैध्दांतिक स्वरूपात मांडले. या प्रतिमानानुसार मजुरांना मिळणाऱ्या वस्तूंची चणचण वा तुटवडा हा विकासाच्या मार्गातील खरा अडसर असतो, म्हणून उपभोग्य वस्तुनिर्मितिक्षेत्राचा विस्तार करणे, हे अतिशय महत्त्वाचे कार्य ठरते.

‘उपभोग्य वस्तु-गुणक’(कन्झम्प्शन गुड्स मल्टिप्लायर) व ‘नोकरीयोग्य एकक’ (एम्प्लॉयेबल युनिट) ह्या वकिल यांच्या महत्त्वपूर्ण संकल्पना मानण्यात येतात. अवजड उद्योग प्रतिमान (महालनोबिस प्रतिमान) हे जर चलनवाढीच्या अर्थकारणाबरोबर राबविण्याचे ठरविले, तर देशाच्या दृष्टीने गरिबी व बेकारी या दोहोंत वाढ तसेच सततची चलनवाढ अवस्था ह्यांमुळे लोकांच्या एकूणच जीवनात हालअपेष्टांना पारावार राहणार नाही, असे वकील यांचेप्रतिपादन होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्रामीण भागात करावयाची प्रगती वा विकास हा बाहेरून न करता, त्याची जाणीव ग्रामस्थांना आपण होऊन व्हावयास हवी, ग्रामीण विकासात मानवी घटक हा सर्वाधिक महत्त्वाचा मानला गेला पाहिजे.

वकील हे उजव्या विचासरणीचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारांचा ठसा त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांवर दिसून येतो. या विद्यार्थ्यांत प्रसिद्ध साम्यवादी पुढारी बी. टी. रणदिवे यांसारख्यांचा अंतर्भाव होतो. वकील यांच्यामुळे विशेष ख्याती पावलेल्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये व्ही. के. आर. व्ही. राव. आर्. एन्. हजारी, एम्. एल्. दांतवाला, धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला, पी. आर. ब्रम्हानंद यांसारख्यांचा समावेश होतो.

पाकिस्तानच्या दोन विभागांत (पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान) आर्थिक संघर्ष निर्माण होऊन त्या देशाचे विभाजन होईल, असे भाकीत वकील यांनी वर्तविले होते बांगला देशाच्या निर्मितीने (१९७१) ते खरे ठरले.

१९७९ : अर्थ तज्ञ् चंदुलाल नागिनदास वकील यांचे निधन ( जन्म : २२ ऑगस्ट १८९५ )

*घटना :

१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
१९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

• मृत्यू :

••१९९१ : स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन ( जन्म : १४ नोव्हेंबर, १९१९ )
•१९९९ : भारत अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन ( जन्म : १७ डिसेंबर, १९१० )

  • जन्म :
    १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च , १९३१)
    १८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर, १९६४)
    १९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च, १९९३)
    १९३७: पद्मश्री पुरस्कार सन्मानित संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.
    १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »