बबनराव शिंदे साखर कारखान्याची ७६ लाखांची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बार्शी : बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याची बनावट मेल आयडी तयार करुन २ हजार ३० पोते साखर घेऊन ७६ लाख ६०० रुपयांची फसवणूक केली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रफिक बाबा शेख(रा.कुंभारगाव,ता.करमाळा),मिनोज बाबा शेख(रा.गणपती विसर्जन घाट,बालेवाडी बाणेर पुणे), गजाला रफिक शेख(रा.ग्रॅन्डुअर पार्क,फ्लॅट बी १६०३ बालेवाडी, भारती विद्यापीठ जवळ पुणे),राजीव नेताजी मोरे(रा.बिरणवाडी, ता.तासगाव,जि.सांगली)ओंकार पवार(रा.तासगाव,जि.सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्याद कारखान्याचे रोखपाल अमोल संदीपान मोहिते यांनी दिली ही घटना १७ डिसेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »