चिंतामणराव कोल्हटकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, मार्च १२, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २१ , शके १९४६
सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १८:४७
चंद्रोदय : १७:१८ चंद्रास्त : ०६:१२, मार्च १३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – ०९:११ पर्यंत
नक्षत्र : मघा – ०४:०५, मार्च १३ पर्यंत
योग : सुकर्मा – १३:०० पर्यंत
करण : तैतिल – ०९:११ पर्यंत
द्वितीय करण : गर – २१:५० पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : १२:४८ ते १४:१८
गुलिक काल : ११:१८ ते १२:४८
यमगण्ड : ०८:१९ ते ०९:४९
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२४ ते १३:१२
अमृत काल : ०१:३०, मार्च १३ ते ०३:१४, मार्च १३
वर्ज्य : १५:१० ते १६:५३

अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. आयुर्वेदानुसार अग्निहोत्रामुळे अनेक व्याधींवर उतार मिळतो व आरोग्य वाढीला लागते.

अपायकारक जिवाणूंना निष्क्रिय करण्याचे सामर्थ्य अग्निहोत्रात आहे. आपण अग्निहोत्रातील अग्नी समोर बसलो आणि हविद्रव्याच्या ज्वलनातून निघणारा धूर श्वासाने आत घेतला, तर तो पटकन फुफ्फुसात आणि रक्त प्रवाहात पसरतो. याचा रक्ताभिसरण क्रियेवर उत्कृष्ट परिणाम होतो आणि अग्निहोत्र भस्म सेवन केल्यास त्याहीपेक्षा अधिक चांगला परिणाम होतो.

वनस्पतींना वातावरणातील पोषणद्रव्य मिळतात, त्या सुखावतात आणि त्यांचे पोषण आणि वाढ उत्तम होते. सूर्य ऊर्जा आणतो आणि ऊर्जा घेतो, त्यामुळे प्रदूषण नाहीसे करण्यासाठी जी स्थिती आवश्यक असते, ती पोषक स्थिती आपोआप निर्माण होते.

आज विश्व अग्निहोत्र दिन आहे.

आज समता दिवस आहे. (कैं यशवंतराव चव्हाण जन्मदिन – हा दिवस समता दिन म्हणून पाळला जातो )

नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर – सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्भुत असाच आहे.

कोल्हटकर इ.स. १९११मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४ मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळी. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.

कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले.

राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला.

चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्चर्समध्ये रूपांतर केले.पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपटव्यवसायतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले.

चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले.

कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.

१८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

२ मार्च १९९३ रोजी भारताची आर्थिक राजधानी बॉम्ब स्फोटांनी हादरून गेली.

दुपारी १.३० वा. बॉम्बे स्टॉक exchange मध्ये १ला स्फोट झाला. नरसी नाथ स्ट्रीट , शिव सेना भवन , एयर इंडिया बिल्डिंग , सेंचुरी बाज़ार, माहिम , झावेरी बाज़ार , सी रॉक होटल , प्लाजा सिनेमा , जुहू सेंटूर होटल , सहार हवाई अड्डा , एयरपोर्ट सेंटूर होटल ह्या ठिकाणी झालेल्या स्फोटात ३०० हुन अधिक निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले तर १००० हुन अधिक जखमी झाले.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम कासकर ह्याचा बॉम्ब स्फोट धडवून आणण्यात हात होता. त्याला दोषी मानले गेले तरी अद्यापही भारतात आणण्यात भारतात सरकार अपयशी ठरले आहे.
स्फोटातील एक दोषी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात 30 जुलै २०१५ ला ( २२ वर्षांनंतर ) देण्यात आली. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा झालेला याकूब एकमेव आरोपी आहे.
१९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

  • घटना :

१८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.
१९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.
१९३०: महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
१९६८: मॉरिशस इंग्लंडपासून स्वतंत्र झाला.
१९९१: जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.
१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.
१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

• मृत्यू :

• १९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर, १८८०)

  • जन्म :
    १९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म. (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)
    १९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)
    १९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.
    १९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »