जागतिक चॉकलेट दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज सोमवार, जुलै ७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १६, शके १९४७
सूर्योदय : ०६:०७ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १६:३० चंद्रास्त : ०३:३२, जुलै ०८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वादशी – २३:१० पर्यंत
नक्षत्र : अनुराधा – ०१:११, जुलै ०८ पर्यंत
योग : शुभ – २२:०३ पर्यंत
करण : बव – १०:१५ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २३:१० पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : वृश्चिक
राहुकाल : ०७:४६ ते ०९:२५
गुलिक काल : १४:२३ ते १६:०२
यमगण्ड : ११:०४ ते १२:४३
अभिजितमुहूर्त : १२:१७ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १३:१० ते १४:०३
दुर्मुहूर्त : १५:४९ ते १६:४२
अमृत काल : १३:४३ ते १५:२९

” असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ”
जगात खूप कमी लोक असतात ज्यांना चॉकलेट आवडत नाही, तर काही लोक चॉकलेटतचे दिवाने असतता. तसेच चॉकलेटला फक्त लहान मुलानाच आवड नाही तर वयोवृद्ध ही चॉकलेटला पसंती देतात. कोणाचा वाढदिवस असो, एखाद्याला मनवायचे असेल किंवा सण-उत्सव असतील याला विशेष बनवायचे असल्यास ते चॉकलेट शिवाय अपूर्ण आहे.

चॉकलेट हा एखाद्याला आनंदित करण्याचा बहुधा सोपा मार्ग असतो. त्यामुळे चॉकलेटसाठी वेड असणाऱ्या चॉकलेट प्रेमीना शुभेच्छा !

आज जागतिक चॉकलेट दिन आहे.

संगीतकार अनिल बिस्वास – कोलकाता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा इ.स. १९३४च्या सुमारास मुंबईला आले. इ.स. १९३५ पासून त्यांच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीला प्रारंभ झाला. जागीरदार, अलीबाबा, औरत इत्यादि चित्रपटांना उत्तम संगीत देऊन त्यांनी १९४० पर्यंत छान ज़म बसवला. इ.स. १९४१ ते इ.स. १९५० या दशकात त्यांची प्रतिभा बहरत होती. सुरेंद्र, पारुल घोष, अख्तरी फ़ैज़ाबादी (बेगम अख्तर), अमीरबाई कर्नाटकी, खान मस्ताना, अरुण कुमार, पुढे सूफ़ी सन्त झालेले अश्रफ़ खान, सुरैया ही त्यांच्या संगीतावर गाणी गायलेल्या गायकांची ठळक नावे. स्वतः अनिलदा उत्तम गात. पाचव्या दशकाच्या उत्तरार्धात लता, मुकेश, तलत महमूद, मीना कपूर हे नवीन कलाकार त्यांच्या रचना गाऊ लागले होते.

या कलाकारांबरोबर त्यांनी इ.स. १५५५-५६ पर्यंत अत्यंत दर्जेदार संगीत दिले. त्यानन्तर त्यांचा सिनेसृष्टीशी संबंध कमी होत गेला. इ.स. १९६०-६१ मधे मित्र पन्नालाल घोष, भाऊ सुनील बिस्वास, मुलगा प्रदीप बिस्वास यांच्या निधनामुळे अनिलदा खचले आणि मुंबई सोडून त्यांनी द्वितीय पत्नी मीना कपूर यांच्याबरोबर दिल्लीला मुक्काम हलवला. या दशकातल्या सौतेला भाई, छोटी छोटी बातें या चित्रपटांतल्या गाण्यांतही दादांच्या प्रतिभेचा प्रत्यय रसिकांना मिळतो. दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी काही काळ काम केले. प्रामुख्याने इ.स. १९३५ ते इ.स. १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपटगीतांसाठी चाली बांधलेल्या बिस्वासांना भारतीय चित्रपटक्षेत्रात प्रथमच पाश्चात्त्य वृंदसंगीताचा वापर करण्याचे श्रेय दिले जाते.

पण, फार कमी लोकांना माहिती असावं की, अनिलदा हे स्वत: संगीतकार व्हायच्या आधी एक क्रांतिकारी होते. बरिसाल, पूर्व बंगाल येथे त्यांना ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लढण्याकरिता अनेकदा अटक झाली आहे. त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेचे पेपर्स देण्याकरिता पोलिस जेलमधून परीक्षा केंद्रात घेऊन जात असत. १९३० च्या दरम्यान ते बरिसालच्या पोलिसांना हुलकावणी देत कोलकात्याला पोहोचले. पण करायचं काय कोलकात्यात हा प्रश्न भेडसावत होता. काही दिवस चहावाल्याच्या दुकानात काम केले.

१९१४: संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे, २००३)

  • घटना :
    १५४३: फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.
    १७९९: रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.

१८५४: कावसजीदावर यांनी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये सुरू केली.
१८९६: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
१८९८: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.
१९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.
१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.
१९७८: सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारे बोरिस बेकर सर्वात तरुण खेळाडू बनले.

• मृत्यू :
१९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)

  • जन्म :
    १६५६: शीख धर्माचे आठवे गुरू हरकिशन देव यांचा जन्म. गुरू हरकिशन देव यांना वयाच्या ८ व्या वर्षी गुरु पद मिळाले. पण महामारीच्या आजारात त्यांचे अकाली निधन झाले. (मृत्यू: ३० मार्च , १६६४)
    १९२३: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा. लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.
    १९४८: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर, १९९६)
    १९६२: पद्मश्री पुरस्कार सन्मानित गायिका पद्मजा फेणाणी यांचा जन्म.
    १९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.
    १९८१: २००७ आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२०, २०११ क्रिकेट विश्वचषक, विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार , पद्म श्री ,पद्म भूषण, पद्म श्री , राजीव गाँधी खेल रत्न पुरस्कार पुरस्कार सन्मानित भारतीय क्रिकेटपटू माही – महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »