सहकारमंत्र्यांची ‘भीमा पाटस’ला क्लीन चिट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही, असा निर्वाळा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिला. त्यामुळे कारखाना अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, कारखान्यातील आर्थिक अनियमितताप्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी, असा आदेश दौंडच्या न्यायालयाने दिल्याने कुल विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

ठाकरे गटाच्या दोन आमदारांनी तारांकित प्रश्नाद्वारे भीमा पाटस कारखान्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना, ‘२०२१ च्या लेखा परीक्षण अहवालात कारखान्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसून आलेले नाही; अन्य अहवालांची छाननी सुरू आहे’, असे लेखी उत्तर सहकारमंत्र्यांनी दिले होते.

दरम्यान, दौंड न्यायालयाच्या २७ जुलैच्या आदेशाचा उल्लेख करत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेवराव ताकवणे यांनी कुल यांच्यावर टीका केली, तसेच सरकारच्या ’क्लीन चिट’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »