व्हीएसआय चौकशीसाठी समिती गठित

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे ः राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान-निधीसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) चौकशी करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता.  त्‍यानुसार साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सूचनांनुसार ही पाचसदस्यीय समिती गठित करण्यात आल्याचे समजते. दोन महिन्यांच्या आत या समितीला आपला अहवाल राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे.

 ‘व्हीएसआय’ला दरवर्षी सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक निधी दिला जातो. उसाच्या नवनवीन जातींचे संशोधन आणि उपपदार्थांच्या निर्मिती, सल्ला, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरावर तसेच येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ‘व्हीएसआय’चे काम चालते. ‘व्हीएसआय’ या संस्थेस साखर संशोधनासाठी देण्यात येणारे अनुदान तसेच प्रतिटन ऊस गाळपावर देण्यात येणाऱ्या एक रुपया निधीचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होतो आहे काय? याबाबत संबंधिताकडून ही समिती चौकशी करेल. दरम्यान, माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार हे अनेक वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष राहिले आहेत. ‘व्हीएसआय’च्या विश्वस्तांमध्ये बहुतांश महाविकास आघाडीचे साखर उद्योगातील वरिष्ठ नेते कार्यरत आहेत. त्‍यामुळे राजकीयांचे धाबे दणाणले आहेत.

चौकशी समितीत कोणाचा समावेश?

१. डॉ. संजय कोलते  (साखर आयुक्त)

२. यशवंत गिरी (साखर संचालक, (अर्थ)

३.  बी. एस. बडाख. (साखर सह सचालक, (लेखापरीक्षण)

४. पांडुरंग मोहळकर (द्वितीय विशेष, लेखापरीक्षक, वर्ग १ )

५. सचिन रावल (सदस्य सचिव, साखर सह संचालक (अर्थ)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »