पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर सहा आठवड्यांत निर्णय द्यावा, असे निर्देशउच्च न्यायालयाने केंद्रीय निबंधकांना दिले होते. त्यानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांची मते ऐकल्यानंतर केंद्रीय निबंधकांनी तक्रारदारांचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, असे स्पष्ट केले. तसेच कारखाना अधिनियमातील तरतुदीनुसार विशिष्ट संस्था नसल्याने मल्टिस्टेट अॅक्ट कलम १२२ व १२३ लागू होत नाहीत, त्यामुळे प्रशासक नेमता येत नाही, असे नमूद करून याचिका फेटाळली. कारखाना रेणुका शुगर्सया खासगी संस्थेला भाडेकराराने दिल्यामुळे मल्टिस्टेट अॅक्ट कलम १७चे उल्लंघन झाले, असा आरोप होता. मात्र, वार्षिक सभेत ठराव मंजुरीने हा करार झाल्याचे स्पष्ट करून तो आरोप फेटाळण्यात आला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »