‘स्वजित इंजिनिअरिंग’ येथे “कन्व्हेयर चेन्स” वर तांत्रिक प्रशिक्षण

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : साखर उद्योग आणि इतर विविध संलग्नित औद्योगिक क्षेत्रांत मटेरियल हॅण्डलिंगसाठी सातत्याने वापर होत असलेल्या ‘हेवी ड्यूटी स्टील कन्व्हेयर चेन्स’ या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील “स्वजित इंजिनिअरिंग” या वाळूज स्थित उद्योग समुहामध्ये २ व ३ ऑगस्ट असे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले.

या तांत्रिक प्रशिक्षण शिबिराला संपूर्ण राज्यांतून प्रचंड व भरघोस असा प्रतिसाद मिळाला. संबंधित क्षेत्रांतील सर्वच सन्माननीय वरिष्ठ अधिकारी, सिनिअर इंजिनिअर्स व कुशल तंत्रज्ञांची आवर्जून उपस्थिती ही विशेष उल्लेखनीय बाब होती.
या शिबिरामधे साधारपणे ७० साखर कारखान्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि तसेच २२५ इंजिनियर्स व तंत्रज्ञ यांनी देखील प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

सेमिनार प्रेझेंटेशन मधे ‘कन्वेयर चेन’ च्या उच्च गुणवत्ता प्राप्ती साठी लागणाऱ्या सर्वच तांत्रिक बाबींचे अभ्यासपूर्ण व विविधांगी विवेचन आणि विश्लेषण केले गेले. जसे की, विशिष्ट योग्य प्रकाराच्या स्टील संयुगांचा वापर, त्यावर अत्याधुनिक स्पेशल पर्पज मशीन्सव्दारे करण्यांत येणारी वेगवेगळी ऑपरेशन्स, हीट ट्रीटमेंट प्रोसेसेस आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्वांच्या माध्यमांतून साधण्यांत येणारी मटेरियल आणि पैश्यांची सुयोग्य बचत.
अश्या प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमांतून कारखान्यांची आर्थिक बचत तर होणारच आहे, शिवाय उच्च गुणवत्तेचे ज्ञान कारखान्यांतील इंजिनियर्स व तांत्रिक कर्मचारी यांना मिळाल्याचे समाधान देखील लाभणार आहे.

विशेष म्हणजे शिबिरांत सहभागी होण्याचा बहुमान मिळविण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांची, राहण्याची व भोजनाची व्यवस्था ‘स्वजित इंजिनिअरिंग’ कंपनी तर्फे संभाजीनगरच्या तारांकित हॉटेल मध्ये करण्यात आली होती.

या सेमिनारच्या यशस्वितेसाठी स्वजित कंपनीचे श्री. अजित चव्हाण आणि वीरेंद्र चव्हाण यांच्यासह व्यंकटेश धारुरकर व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी अतिशय मोलाची, भरीव कामगिरी पार पाडली.`

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »