शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्याने आंदोलकांवर गुन्हे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शिरोळ : राज्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अद्याप काही कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्‍याने, तसेच ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काही अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. शिरोळ येथील घालवाड फाटा येथे शनिवारी (दि. ८) ऊस वाहतूक रोखत शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचा उल्लंघन केल्याप्रकरणी १६ जणांवर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, एकनाथ माने, अक्षय पाटील, विजय माने, सुमित इंगळे, अनिकेत सूर्यवंशी, राहुल माने, खंडू माने, शशिकांत काळे, पोपट संकपाळ, बाबू पाटील, भूषण गंगावणे, संभाजी माने, सागर माने, (सर्व रा. शिरोळ), दीपक पाटील (रा. सैनिक टाकळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अस्लम मखमल्ला (रा. आलास), सुदर्शन गडगे (रा. बुबनाळ) व इरफान पाटील (रा. शेडशाळ) यांनी शिरोळ पोलिसांत दिली होती. घालवाड फाटा येथे शनिवारी आंदोलक व कारखाना प्रशासनामध्ये वादावादीची घटना घडली होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »