गाळप हंगामाबाबत मंगळवारी निर्णय

पुणे: ऊस गाळप हंगाम 2025-26 चा मुहूर्त कधी करायचा याचा निर्णय ३० सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिसमितीच्या बैठकीत होणार आहे. मंत्री समितीची बैठकीची तारीख तिसऱ्यांदा बदलली आहे..
कृषी विभागाच्या माहितीनुसार १३ ते १४ लाख हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र आहे. गूळ-खांडसरी, रसवंती आणि ऊस बेण्यासाठी जाऊन साखर कारखान्यांना प्रत्यक्षात 1200 ते 1250 लाख मेट्रिक टन एवढा ऊस राहण्याचा अंदाज आहे.