‘भारतीय शुगर’च्या व्हाईस प्रेसिडेंटपदी रासकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : तब्बल ५० वर्षांचा वारसा असलेल्या ‘भारतीय शुगर’ या प्रकाशनाच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी (व्हाईस प्रेसिडेंट) साखर उद्योग क्षेत्रातील जाणार आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व डी. एम. रासकर यांची निवड करण्यात आली आहे. ‘शुगरटुडे’कडून त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

साखर उद्योग क्षेत्राची सुमारे चार दशकांहून अधिक काळ सेवा करणारे श्री. रासकर हे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

साखर उद्योगात मोठे बदल घडवत, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने कोणतीही मोठी नवीन गुंतवणूक न करता कृषी, अभियांत्रिकी, उत्पादन आणि डिस्टिलरी यांसारख्या विविध विभागांमध्ये लक्षणीय खर्च कपात आणि महसूल वाढ साधली आहे. त्यामध्ये रासकर यांचेही योगदान आहे.

रासकर यांच्या मते, उद्योगाला संसाधनांची कार्यक्षमता, सांघिक कार्य आणि शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून कामकाजात सुधारणा करता येतात. विशेष म्हणजे, यासाठी प्रमुख भांडवली गुंतवणूक नसतानाही लक्षणीय परिणाम मिळवता येतात. जे काही करायचे ते टिकावू, फायदेशीर आणि कमी खर्चात झाले पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यांनी आपले मॉडेल यशस्वी करून दाखवले आहे. ते ‘शुगरटुडे’मध्येदेखील विविध विषयांवर लिखाण करतात. जटील विषय सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे आहे. त्यांचे अनेक शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचे ज्ञान, अनुभव आणि समर्पण पाहून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे ‘भारतीय शुगर’ने म्हटले आहे.

त्यांना पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »