डी. एम. रासकर : वाढदिवस शुभेच्छा

साखर उद्योगातील तज्ज्ञ, अभ्यासू, प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डी. एम. रासकर. ते श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचा ३१ जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
साखर उद्योगात मोठे बदल घडवत, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने कोणतीही मोठी नवीन गुंतवणूक न करता कृषी, अभियांत्रिकी, उत्पादन आणि डिस्टिलरी यांसारख्या विविध विभागांमध्ये लक्षणीय खर्च कपात आणि महसूल वाढ साधली आहे. त्यामध्ये रासकर यांचेही योगदान आहे.
रासकर यांच्या मते, उद्योगाला संसाधनांची कार्यक्षमता, सांघिक कार्य आणि शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून कामकाजात सुधारणा करता येतात. विशेष म्हणजे, यासाठी प्रमुख भांडवली गुंतवणूक नसतानाही लक्षणीय परिणाम मिळवता येतात. जे काही करायचे ते टिकावू, फायदेशीर आणि कमी खर्चात झाले पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यांनी आपले मॉडेल यशस्वी करून दाखवले आहे. ते ‘शुगरटुडे’मध्ये विविध विषयांवर लिखाण करतात. जटील विषय सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे आहे. त्यांना पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!