‘दामाजी’तर्फे सभासदांना २० रुपये किलोने साखर वाटप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

गुढीपाडव्यालाही वितरण सुरू राहणार

मंगळवेढा: श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने आपल्या सभासदांसाठी गुढीपाडव्याची गोड भेट जाहीर केली आहे. सणानिमित्त सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

सभासदांना प्रति किलो फक्त २० रुपये या दराने साखर मिळणार असून, प्रति शेअर २५ किलो साखर दिली जाणार आहे.

 साखर वाटप १४ ते २१ मार्च दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विविध केंद्रांवर होईल. सभासदांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टी आणि गुढीपाडव्याच्या दिवशीही साखर वितरण केंद्रे सुरू राहतील.

काही कारणास्तव साख रघेता न आल्यास:
ज्या सभासदांना या निश्चित कालावधीत साखर घेता येणार नाही, त्यांना डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत दर शुक्रवारी (सुट्टी वगळून) सकाळी १० ते ५ या वेळेत कारखाना साइटवर साखर उपलब्ध करून दिली जाईल, असे प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण असून, वेळेत साखर घेण्याचे आवाहन कारखान्यातर्फे करण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »