भारत तावरे (वाढदिवस विशेष)
श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर (प्रोडक्शन) श्री. भारत तावरे यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्याबद्दल त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !!
ऊक्कलगाव (श्रीरामपूर) चे सुपुत्र असलेले श्री. तावरे हे शुगर टेक्नॉलॉजजिस्ट असून, साखर उद्योगातील अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात बजाज हिंदुस्थान शुगर लि. येथून केली. नंतर त्यांनी शंकर स.सा.कारखाना लि,यवतमाळ, वालोद शुगर लि. गुजरात येथे उभारणी, कमिशनिंग व इंदापूर स.सा.कारखाना लि. इंदापूर येथे ३५०० टन ते ६००० टन पर्यंत विस्तारवाढीच्या वेळेस मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट या पदावर काम केले आहे.
श्री आदिनाथ स.सा.कारखाना लि. करमाळा येथे इनचार्ज चिफ केमिस्ट म्हणुनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. त्यानंतर भीमा स.सा.कारखाना लि.पाटस (७५०० टीसीडी) येथे पाच वर्ष कामकाज केले. त्यानंतर श्री.गुरुदत्त शुगर्स लि.टाकळीवाडी साठी येथे २००६ साली डेप्युटी चिफ केमिस्ट म्हणुन कामकाजास सुरुवात केली. ते पुढे चिफ केमिस्ट झाले.
गाळप हंगाम २०१२-१३ मध्ये १३.३९ टक्के, २०१३-१४ मध्ये १३.२३ टक्के, २०१४-१५ मध्ये १३.३४ टक्के आणि
२०१५-१६ हंगामात १३.६२ टक्के अशी विक्रमी रिकव्हरी गुरुदत्त शुगर्स लि.च्या इतिहासात श्री. तावरे यांच्या कार्यकाळात झाली.
गुरुदत्त शुगर्स लि. टाकळीवाडी येथे सलग दहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी श्री दत्त दालमिया आसुर्ले- पोर्ले कोल्हापूर येथे २०१७ -१८ उपसरव्यवस्थापक प्रोडक्शन पदी (डीजीएम) नियुक्ती करण्यात आली व दालमिया शुगर ची रिकव्हरी १२.७२ ची १३.४० पर्यंत वाढविण्यात त्यांनी यश मिळविले. त्यांच्या उत्तम कामगिरीवर खूश होऊन त्यांना ‘जीएम’पदी पदोन्नती देण्यात आली.
२०२० साली ते श्री दत्त इंडिया प्रा. लि. मध्ये ‘जीएम’ पदावर रूजू झाले आणि यशाची कमान उंचावत नेली. त्यांना पुन्हा वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !!