दत्तोपंत ठेंगडी

आज सोमवार, ऑक्टोबर १४, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २२ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१६
चंद्रोदय : १६:०५ चंद्रास्त : ०४:०५, ऑक्टोबर १५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : भागवत एकादशी – ०६:४१ पर्यंत
क्षय तिथि : द्वादशी – ०३:४२, ऑक्टोबर १५ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – ००:४३, ऑक्टोबर १५ पर्यंत
योग : गण्ड – १८:०१ पर्यंत
करण : विष्टि – ०६:४१ पर्यंत
द्वितीय करण : बव – १७:१५ पर्यंत
क्षय करण : बालव – ०३:४२, ऑक्टोबर १५ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : कुंभ
राहुकाल : ०८:०० ते ०९:२८
गुलिक काल : १३:५२ ते १५:२०
यमगण्ड : १०:५६ ते १२:२४
अभिजितमुहूर्त : १२:०१ ते १२:४८
दुर्मुहूर्त : १२:४८ ते १३:३५
दुर्मुहूर्त : १५:०८ ते १५:५५
अमृत काल: १८:०९ ते १९:३७
वर्ज्य : ०९:२५ ते १०:५२
वर्ज्य : ०६:२६, ऑक्टोबर १५ ते ०७:५१, ऑक्टोबर १५
कोणत्याही वस्तुचे मानक हे त्या वस्तुची गुणवत्ता, कार्यक्षमता, सुरक्षितता प्रत्यक्ष त्या वस्तुच्या व्यवहारातील वापरलेल्या कृतीवरुन ठरविले जाते.मानकासंदर्भात निर्धारित केलेल्या नियमानुसार परिक्षण तपासणी करुनच उत्पादकाला आय.एस.आय. (ISI) प्रमाणित चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाते. हे चिन्ह असलेल्या वस्तू ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या वस्तुंच्या गुणवत्तेची खात्री देते. खाद्य वस्तू आणि ज्या वस्तूंवर ग्राहकांचे आरोग्य, सुरक्षितता अवलंबून आहे, अशा वस्तुंना ग्राहकांचे हित लक्षात देऊन केंद्र सरकारने भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणित चिन्ह सक्तीचे केले आहे.
आज आंतरराष्ट्रीय मानक दिन आहे
भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी – शिशुवस्थेपासूनच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघरूपी पाठशाळेचे विद्यार्थी होते. तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. आर्वी तालुका वानरसेनेचे दत्तोपंत १९३४ साली अध्यक्ष झाले.
इ.स. १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी स्वतःला संघकार्याला वाहून घेतले. आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. त्याच वर्षी ते केरळ प्रांताचे प्रांत प्रचारक झाले. कम्युनिस्टांचे सरकार आणि संघाचा कट्टर विरोध अशा वातावरणात जिवाची बाजी लावूनच संघाचा प्रचार आणि प्रसार करावा लागत असे. ते आव्हान दत्तोपंतांनी स्वीकारले. केरळ प्रांतात सर्वदूर संघाचे जाळे विणण्याचे काम त्या वेळी त्यांनी केले. पुढे दत्तोपंत संघ विस्तारासाठी १९४८-४९ मध्ये दत्तोपंत बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक होते, संघदृष्ट्या दोन्ही प्रांतांची स्थिती केरळसारखीच होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले.
दत्तोपंतांची कुशाग्र बुद्धी, प्रामाणिकपणा, कार्याविषयी एकनिष्ठता, दूरदृष्टी सर्वांनाच प्रभावित करीत असे. गोळवलकर गुरुजींनी त्यांच्यातील या गुणांची अचूक पारख केली. गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात काम करण्याची क्षेत्राची जबाबदारी सोपवली.
कामगार क्षेत्र दत्तोपंतांकरिता नवखे होते. १९२० पासून कामगार क्षेत्रात कम्युनिस्टांचे वर्चस्व होते. कामगार क्षेत्र राजकारणी लोकांच्या हातचे बाहुले बनले होते. कम्युनिस्टांचे कामगार क्षेत्रातील वर्चस्व पचनी न पडल्यामुळे, काँग्रेसने १९४८ साली इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक)ची स्थापना केली. या संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगारांच्या समस्यांचे जवळून अवलोकन केले. १९५०-५१ मध्ये दत्तोपंत वरील संघटनेचे मध्यप्रदेशचे संघटनमंत्री होते.
कामगार क्षेत्राचे आंतर-बाह्य स्वरूप बघितल्यानंतर, २३ जुलै १९५५ रोजी भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. कामगारांत राष्ट्राभिमान जागविण्याचे कार्य करताना भारतीय मजदूर संघ राष्ट्रहित आणि उद्योगहिताला अधिक प्राधान्य देईल, आणि कामगारांचे ज्वलंत प्रश्न हाताळताना आवश्यकतेनुसार समविचारी राजकीय पक्षाचा सहयोग घेईल, असे दत्तोपंतांनी पाहिले.
भा.म. संघाचा सदस्य, कार्यकर्ता, पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य, पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही निवडणूक लढविणार नाही. मात्र, समविचारी राजकीय पक्षाशी संबंधच ठेवू नये, असे दत्तोपंतांनी कुठेही म्हटल्याचे स्मरणात नाही. वरील पथ्ये पाळीत समविचारी राजकीय पक्षाशी मधुर संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात, अशी त्यांची धारणा होती.
सरकारशी संबंध कसे असावेत, याबाबत दत्तोपंतांचे विचार अधिक स्पष्ट होते. ते म्हणायचे- केंद्रात अथवा राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असू देत, ज्या प्रमाणात सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल त्याच प्रमाणात भा. म. संघ प्रतिसाद देईल. हा भा.म. संघाचा धोरणात्मक निर्णय समजावा. राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार आणि समस्त जनतेला वेठीस धरून संप करणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. दत्तोपंतांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.
सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना ‘पद्मभूषण’ ही उपाधी देण्याची घोषणा केली. परंतु, दत्तोपंतांची तत्त्वे इथेही आडवी आलीत. हा सन्मान विनम्रपणे नाकारताना राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात दत्तोपंत म्हणतात- जोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना ‘ भारतरत्न ‘ उपाधी देऊन सम्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेली उपाधी मला स्वीकारता येणार नाही. दत्तोपंतांची ती इच्छा अजूनही पूर्णत्वाला गेली नाही. हे दुर्दैव !
• २००४: भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ,स्वदेशी जागरण मंच,सामाजिक समरसता मंच,सर्व पंथ समादर मंच,अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रणेते संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९२०)
- घटना :
१८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.
१९१२: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅन्क या वेडसर व्यक्तीने खुनी हल्ला केला.
१९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.
१०२६: ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.
१९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-१ या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.
१९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. ( तिथीनुसार – दसऱ्याचा दिवस )
१९८१: उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.
१९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.
१९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.
• मृत्यू :
• १९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट, १८७२)
• १९५३: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी, १८८२)
• १९९० : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संघ प्रचारक श्री दत्ताजी डिडोळकर यांचे निधन ( जन्म : ७ ऑगस्ट, १९२४ )
• १९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)
• १९९४: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट, १९१०)
• २०१३ केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी, १९२५)
• २०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे, १९३०)
- जन्म :
- १९२४: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट, १९९७)
१९३१: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी, १९८६)
१९३६: लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर, २०१०)
१९५८: इटावा घराण्याचे सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म.
१९८१: भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा जन्म.