पं. दीनदयाळ उपाध्याय
आज बुधवार, सप्टेंबर २५, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ३ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२८
सूर्यास्त : १८:३२
चंद्रोदय : ००:४६, सप्टेंबर २६
चंद्रास्त : १३:४६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – १२:१० पर्यंत
नक्षत्र : आर्द्रा – २२:२३ पर्यंत
योग : वरीयान् – ००:१८, सप्टेंबर २६ पर्यंत
करण : कौलव – १२:१० पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ००:१२, सप्टेंबर २६ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मिथुन
राहुकाल : १२:३० ते १४:००
गुलिक काल : १०:५९ ते १२:३०
यमगण्ड : ०७:५८ ते ०९:२९
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०६ ते १२:५४
अमृत काल : १२:११ ते १३:४९
वर्ज्य : ०६:२८ ते ०८:०६
पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचे चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.
स्वातंत्र्यसंग्राम चालू होता, तोपर्यंत केवळ स्वातंत्र्य प्राप्त करणे हाच एकमेव हेतू होता. मात्र जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा तो कोणत्या मार्गाने चालावा, याबाबत विविध लोकांची विविध मते होती.
ज्या स्वदेशीच्या आंदोलनाला स्वातंत्र्याचे अधिष्ठान मानले गेले होते, ते कुठेतरी अदृश्य होऊन गेले. आता पाश्चात्त्य राहणीमानाला आणि आचारांना कसे देशात मध्यवर्ती आणता येईल याची शर्यत लागली होती. त्यांची राजनीती, अर्थनीती, त्यांची जीवनमूल्यधारणा यांना आधुनिक आणि स्वीकारार्ह समजले जाऊ लागले. ते घेऊनच देशाची नीती निश्चित होऊ लागली. या विचित्र वेळेला एक सौम्य स्वभावाचा मनुष्य या देशासाठी कशी नीती असली पाहिजे यावर बोलत होता. त्याच्याकडे कोणतीही जन्मजात राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तसेच त्याच्याकडे मोठे जनमतही नव्हते !
आपले मौलिक विचार तो आपल्या निवडक साथीदारांशी बोलत राहिला. ज्याप्रमाणे वाहणारे पाणी आपला मार्ग स्वत: निर्माण करते, त्याप्रमाणे हा छोटा झरा हळूहळू पुढे जात राहिला. भारतीय संस्कृतीच्या शाश्वत मूल्यधारेचा हा झरा होता. या व्यक्तीचे नाव होते पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि त्यांच्या विचारधारेचे नाव होते एकात्म मानव दर्शन.
दीनदयाळजी एकात्म मानव दर्शनात म्हणतात – ‘मनुष्याचे चार स्तर असतात. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा. या चारही स्तरांवरील सुखांची प्राप्ती हे मनुष्यजीवनाचे लक्ष्य आहे. या चारांमध्ये आत्मसुख सर्वोच्च आहे.
मनुष्य पृथ्वीवरील अन्य जीवांपेक्षा अधिक विकसित जीव आहे. त्याच्या जीवनात केवळ प्राथमिक भौतिक आवश्यकतांची पूर्ती एवढेच कृतकर्म नसते. शरीर आणि शारीरिक क्रिया ही साधने आहेत, साध्य नाही. आत्म्याची अनुभूती हे त्याच्या जीवनाचे साध्य आहे. काही पश्चिमी विचारवंत आत्मा, ईश्वर यांचे अस्तित्वच अमान्य करतात आणि मानवी जीवन केवळ साधनसंपन्न असेल तरच सुखमय असते, असे मानतात. दीनदयाळजी या गोष्टीचे खंडन करतात. ते म्हणतात, “प्रत्येक मनुष्याला एकतेची अनुभूती येते आणि सृष्टीच्या पलीकडे असलेल्या सूक्ष्मतत्त्वाची अनुभूतीदेखील त्याला येत असते. या संपूर्ण जगताला व्याप्त अशा एका तत्त्वामुळे मनुष्याच्या अंतर्यामी एकात्मतेची भावना उदित होत असते. संपूर्ण सृष्टीची एकात्मता आणि तिचा साक्षात्कार हे मनुष्यजीवनाचे ध्येय आहे. प्रत्येक मनुष्य आपल्याला प्रकृतीनुसार त्याच एका दिशेने पुढे जात असतो.”
पश्चिमी देशात समृद्धी असूनही मनुष्य सुखी नाही, कारण तेथील जीवनपद्धतीत मोठी गफलत आहे. ही गडबड नेमकी कोणती, हे सांगताना दीनदयाळजी म्हणतात, “मानवी प्रगतीचा अर्थ आहे मनुष्याच्या शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चार आयामांची एकत्र प्रगती.
पुष्कळ वेळा लोक असे म्हटले जाते की भारतीय संस्कृती केवळ आत्म्याचा विचार करते. परंतु हे पूर्णपणे खरे नाही. भारतीय संस्कृती आत्म्याचा विचार करते हे बरोबर आहेच, परंतु त्याचबरोबर शरीर, मन आणि बुद्धी यांचादेखील येथे तेवढाच विचार केला जातो. पाश्चात्त्य विचारधारेमध्ये केवळ शरीराचा विचार केला जातो, फारतर मनाचा केला जातो. परंतु आम्ही ‘शरीरम् आद्य खलु धर्मसाधनम्’ असे म्हणतो.
आत्म्याच्या प्राप्तीसाठी शरीराचे महत्त्व येथे समजले जाते. परंतु शरीराला साध्य नाही, तर साधन म्हणून पाहिले जाते आणि त्या दृष्टीनेच शरीराचा विचार केला जातो. भौतिक गरजांची पूर्तता, त्यांचे महत्त्व याला आम्ही निश्चितच स्वीकारलेले आहे. परंतु तीच केवळ एक शेवटची गोष्ट आहे असे आम्ही मानत नाही. त्याला सारसर्वस्व मानत नाही. मनुष्याचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी, मनुष्याच्या विविध इच्छा-आकांक्षांच्या आणि कामनांच्या संतुष्टीसाठी, मनुष्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आमच्या संस्कृतीमध्ये व्यक्तीसमोर कर्तव्याच्या रूपात चार पुरुषार्थांची संकल्पना ठेवली आहे.
धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे हे चार पुरुषार्थ आहेत. या चार पुरुषार्थांवर आधारित भारतीय जीवनदर्शन हे विश्वातील सर्व समस्यांचे उत्तर आहे. हे असे जीवनदर्शन आहे, जे जीवनाचा विचार करताना त्याला तुकड्यातुकड्यांमध्ये विभाजित करत नाही, तर येथे जीवनाला एक एकक मानून विचार केला जातो.”
या विवेचनात पुढे दीनदयाळजी प्राचीन जीवनपद्धतीला युगानूकुल कसे करता येईल, याचे चिंतन मांडतात.
१९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)
डॉ. सतीश धवन – दक्ष अध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंता, निष्ठावान, व्यापक दृष्टिकोन असलेला कार्यक्षम नेता या गुणांमुळे सतीश धवन हे ज्या क्षेत्रात शिरले, त्या संबंधित संस्थेत त्यांनी आमूलाग्र बदल घडवला. डॉ धवन यांचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरचा. पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस. (१९४७), कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विमानविद्या अभियंता, (१९४९) विमान विद्याशास्त्र व गणितात पीएच. डी., (१९५१) अशा तऱ्हेने कला-विज्ञान अभियांत्रिकी मानवशास्त्र यांना कवटाळण्यास शिक्षणविस्तार व विश्वव्यापी दृष्टिकोन असलेला असामान्य शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. सतीश धवन !
डॉ धवन यांनी वायुगतिशास्त्रात संशोधन आरंभले.
त्याकाळी रचनातीत प्रवाह (सुपरसॉनिक फ्लोज्) व शॉक फ्लोज् या गूढविषयावर शोधनिबंध डॉ. धवन यांनी ठोस निरीक्षणांसह सादर केले. त्यातील अचूकतेमुळे ते गाजले. पृष्ठीय घर्षणजन्य प्रेरणा (फ्रिक्शन ड्रॅग) मोजण्याची सोपी पद्धत त्यांनी शोधली. श्लिकटिंग यांच्या ‘बाऊंड्री लेयर’ या ग्रंथाच्या गेल्या अर्धशतकातील सर्व आवृत्त्यांमध्ये धवन यांच्या संशोधनांची नोंद झालीय.
१९७२ मध्ये अवकाश आयोग (स्पेस कमिशन) व भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांच्या अध्यक्षपदी आणि अवकाश विभागात (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) भारत शासनाच्या सचिवपदी झालेली नियुक्ती अनेकांना प्रेरक ठरली. डॉ. साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमात संघटनात्मक व व्यवस्थापकीय शिस्त निर्माण केली, तर इस्रोला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डॉ. धवन यांनी केले.
१९८० साली, बंगलोरमधील इस्रेच्या मुख्यालयात आगामी दोन दशकातील अंतराळ मोहिमांची सांगोपांग चर्चा डॉ. कलाम करत होते. दुस-या दिवशी डॉ. धवन यांनी त्या चर्चेची माहिती घेतली. त्यांनी सोबत आणलेल्या तक्त्यांच्या सहाय्याने आगामी १५ वर्षातील मोहिमांचे आराखडे तयार केले. त्यामध्ये भूस्थिर व उपग्रहांसाठी प्रक्षेपण याने व उपग्रहमालिका यांचा समावेश होता. धवनसर मोहिमेच्या यशाचे श्रेय इतरांना देऊन स्वत: चुका, त्रुटी व अपयशाचे धनी होत.
१० ऑगस्ट १९७९ रोजी, कलामांच्या अध्यक्षतेखाली झालेली मोहीम फसली. पण माध्यम पत्रकारांना तोंड देताना आपले अपयश मान्य करून आगामी मोहीम जबाबदारीने करण्याची ग्वाही धवनसरांनी दिली. यानंतर १९ जुलै १९८० रोजी, दुस-या प्रक्षेपण यानाने ‘रोहिणी’ उपग्रहाला यशस्वीरित्या भ्रमण कक्षात नेऊन सोडले, तेव्हा पत्रकारांसमोर डॉ. कलामांनाच त्यांनी बोलायला लावले. अशा तऱ्हेने धवनसरांनी सहका-यांमध्ये निकोप दायित्वाची भावना फुलवली.
त्यांनी सहका-यांसाठी मूल्यमापन व बढत्या ही पद्धत आणली. त्यामुळे अधिक कार्यक्षम अभियंत्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला. पुढे त्यांनी राष्ट्रीय अंतरीक्ष कार्यक्रम हा नागरी उपक्रम म्हणून राबवला.
१९८० पासून प्रा. धवन यांनी निश्चित केलेल्या पथावरून देशाची संरक्षण तंत्रज्ञानाबाबत प्रगती झाली व तो स्वयंपूर्ण ठरलाय.
इस्रोचे अध्यक्ष म्हणून एक तपाच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर २००२ रोजी ‘इस्रोचे ’ पुनर्नामकरण होऊन ते सतीश धवन स्पेस सेंटर असे केले गेले.
१९२०: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित इस्रोचे अध्यक्ष डॉ सतीश धवन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००२)
- घटना :
१९१५ : पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरु
१९१९ : रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली
१९२९ : डॉ. जेम्स डूलीटील यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या सहाय्याने ( Blind ) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडिंग केले
१९४१ : प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई येथे प्रदर्शित
१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
• मृत्यू :
• १९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल, १८९७)
• १९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून, १९३४)
• २००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर , १९३२)
• २०१३: लेखक शं. ना. नवरे यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर, १९२७)
• २०२० : पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे निधन ( जन्म:४ जून, १९४६ )
जन्म :
१८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.
१९२२: स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म. ( मृत्यू : १८ जानेवारी, १९७१)
१९२५: बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म. ( मृत्यू : २० जुलै १९९४)
१९२६: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)
१९२८: पत्रकार पद्मश्री माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)
१९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)
१९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.
१९४६: भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.(मृत्यु : २३ आॅक्टोबर, २०२३)