उपपदार्थ विभागाच्या सहसंचालकपदी अविनाश देशमुख

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर आयुक्तालयाच्या उपपदार्थ विभागाच्या सहसंचालकपदी अविनाश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांमधील इथेनॉल, प्रेसमड, मळी बगॅस याच्याशी संबंधित समस्यांचा आढावा घेणे सुरू केले आहे.

बीडच्या गेवराईमधील उमापूरमधील शेतकरी कुटुंबातील अविनाश देशमुख यांचा जन्म झाला. ते कृषी शाखेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षेच्या १९९० मधील तुकडीतून ते कृषी खात्यात फलोत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुन्हा परीक्षा देत १९९४ मध्ये ते सहायक निबंधक म्हणून सहकार खात्याच्या सेवेत रुजू झाले. संगमनेर, कराड, पुणे शहर येथे उपनिबंधक म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्याच्या पणन मंडळात गेली चार वर्षे उपसंचालक म्हणून बाजार समिती विभागाचे कामकाज सांभाळत होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »