भीमा साखर निवडणूक : महाडिक पॅनलचा दणदणीत विजय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी एकहाती मोठा विजय मिळवला. महाडिक यांच्या पॅनेलचे सर्व १५ उमेदवार साडेसहा हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. महाडिक यांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्यावर सत्ता काबीज केली आहे.

धनंजय महाडिक यांचे पुत्र विश्वराज महाडिकही या निवडणुकीत उतरले होते. त्यांचा दणदणीत विजय झाल्याने, महाडिक घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात यशस्वी ठरली आहे. तसेच कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पिता आणि पुत्र निवडून आले आहेत.

धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार, तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनेल यांच्यात सामना झाला. कारखान्यासाठी ७९ टक्के मतदान झाले होते. त्याची १४ नोव्हेंबर रोजी सोलापुरात मतमोजणी झाली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महाडिक यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवत कारखाच्या इतिहास मोठा विजय नोंदविला आहे. कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक हे संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विजयी झाले आहेत, तर त्यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक यांनी पुळूज गटातून बाजी मारली आहे. महाडिक पिता-पुत्र प्रथमच कारखान्याच्या संचालकमंडळात दिसणार आहेत.

धनंजय महाडिक गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

पुळूज गट
विश्वराज धनंजय महाडिक (१०६२९)
बिभिषण वाघ (१०२३७)

टाकळी सिकंदर गट
संभाजी कोकाटे (१०५८८)
सुनील चव्हाण (१०५६३)

सुस्ते गट
तात्यासाहेब नागटिळक (१०७६४)
संतोष सावंत (१०१३८)

अंकोली गट
सतीश जगताप (१०१९०)
गणपत पुदे (१००३१)

कोन्हेरी गट
राजेंद्र टेकळे (१०५७१)

सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ
धनंजय महाडिक (३१)

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी
बाळासाहेब गवळी (१०७४६)

महिला राखीव
सिंधू जाधव (१०७७८)
प्रतिक्षा शिंदे (१०२९२)

इतर मागासवर्ग प्रतिनिधी
अनिल गवळी (१०८६४)

भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी
सिद्राम मदने (१०७७८)

चेअरमन निवड २४ ला

टाकळी सिकंदर, (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाइस चेअरमनची निवडण येत्या २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अध्यक्षपदी नूतन संचालक विश्वराज महाडिक यांची तर उपाध्यक्षपदी संचालक सतीश जगताप यांची फेर निवड होण्याची शक्यता आहे.

जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सर्व नूतन संचालकाची बैठक कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली आहे. तत्पुर्वी खा धनंजय महाडिक हे सर्व संचालक मंडळ व प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »