त्रिपक्षीय समितीसाठी प्रस्ताव सादर करा : सहकारमंत्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक

पुणे : साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी कामगार नेते आ. भाई जगताप, सुनील शिंदे, अविनाश आदिक, राजेंद्र व्हनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते, तसेच साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुमोड इ. उपस्थित होते.

या बैठकीमध्ये साखर कामगारांच्या वेतन वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तात्काळ गठीत करून वेतन वाढीचा करार पूर्ण करावा, त्याचबरोबर राज्यातील साखर कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे, ज्या साखर कारखान्यांनी त्रिपक्षीय समितीने केलेला करार व त्याप्रमाणे वेतन वाढ दिलेली नाही, अशा कारखानदारांना क्रशिंगचे लायसन देऊ नये, काही कारखान्यांनी कामगारांची देणे देण्यासाठी सरकारकडून त्याबरोबर काही बँकांकडून कर्ज घेतले आहे; परंतु कामगारांची तिकीट देणे दिलेली नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीच्या मागण्या करण्यात आल्या.

त्यावर सहकारमंत्री वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती गठीत करण्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »