दिलीप वारे : वाढदिवस विशेष
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो!
भीमाशंकर कारखान्यातून ते उत्कृष्ट सेवा देऊन रिटायर झाले. त्यांनी मशीन ऑटोमेशनमध्ये खूप चांगली कामगिरी केली असून, त्यामुळे साखर उतारा वाढीस मदत झाली आहे. या कामाबद्दल त्यांना पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे. त्यांच्या तांत्रिक कामाची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे….(त्यांच्या पुरस्कारप्राप्त निबंधातून साभार)
बॅच मशिन –
NHEC Make-1250 kg/charge-3 Nos.
ABE Make-1750 kg/charge-1 No.
पग्मील ते बॅच टाईप मशिनपर्यंतचे ऑटोमेशन त्यांनी ४ वर्षांपूर्वी केले आहे. ते टप्प्याटप्प्याने
केलेले असून प्रथमतः क्रिस्टलायझरचे पल्प व्हॉल्व्ह काढून त्या ठिकाणी ट्रायल बेसिसवर न्युमॅटिक ऑपरेटेड १२” व्हॉल्व्ह बसवले. न्युमॅटिक व्हॉल्व्हमुळे क्रिस्टलायझर गेटवे ऑपरेटिंग सोपे झाले. परंतु गेटव्हॉल्व्हचे ऑपरेटिंग स्विच मॅन्युअली कन्ट्रोल करीत असल्याने पग्मीलची लेव्हल मेंटेन होत नाही (कमी जास्त होते) असे लक्षात आल्यानंतर पग्मीलमधील मॅस्केट लेव्हलचे सेन्सिंग घेऊन क्रिस्टलायझर गेटचे न्युमॅटीक स्विच ऑन ऑफ़ व्हावे करीता टेक्निकल मॅनेजर व प्रोसेस मॅनेजर यांचेशी चर्चा करुन कार्यवाही केली. अशा पद्धतीने ‘ए’ मॅस्केट पग्मीलचे ऑटोमेशन पूर्ण केले असून मागील ४ वर्षांपासून व्यवस्थित चालू आहे.
ऑटोमेशन : पग्मीलच्या लेव्हल ऑटोमेशनमुळे पग्मीलमधील मॅस्केट लेव्हल एकसारखी राहत असून पग्मीलच्या उंचीपेक्षा ६” खाली मॅक्सिमम लेव्हलचे सेटिंग केलेले असून, मॅक्सिमम पेक्षा ५” खाली मिनिमम लेव्हलचे सेटिंग केलेले आहे.
पग्मीलला एकूण ३ सेन्सर बसविलेले असून एक-मिनिमम, दुसरा मॅक्सिमम व तिसरा डेंजर लेव्हल सेन्स करुन त्यानुसार क्रिस्टलायझरचे गेट ऑटोमॅटिकली ऑन-ऑफ़ (चालू-बंद) होते.
कधी तरी मॅक्सिमम लेव्हलला समस्या आल्यास पग्मील ओव्हरफ्लो होवू नये याकरिता पग्मीलच्या टॉपपेक्षा २” खाली डेंजर झोनचा सेन्सर बसविण्यात आलेला आहे. (आतापर्यंत एकदाही पग्मील ओव्हरफ्लो झालेली नाही). तसेच मिनिमम लेव्हलपेक्षा लेव्हल खाली गेल्यास सायरन (Hooter) वाजतो व क्रिस्टलायझर मधील मॅस्केट संपल्याचा इशारा मिळतो, त्यावेळेस सिलेक्टर स्विच ने दुसरा क्रिस्टलायझर सिलेक्ट करुन मॅस्केट क्युरींग चालू केले जाते.
पग्मील ऑटोमेशनमुळे झालेले फ़ायदे
- १) पग्मीलला मॅक्सेंट सोडण्यासाठी आवश्यक असणारा कामगार कमी झाला.
- २) ऑटोमेशन पूर्वी पग्मीलची लेव्हल कमी/जास्त होत असल्याने मशिनच्या क्युरिंग कॅपॅसिटीपेक्षा कमी क्युरिंग होत होते. ऑटोमेशन नंतर पग्मीलमधील मॅस्केटची लेव्हल एकसारखी राहत असल्याने मशिनच्या प्रत्येक चार्जिंगवेळी मशिनला एकसारखे व क्षमतेप्रमाणे चार्जिंग होत असल्याने मशिनच्या ऑपरेटींग क्षमतेत कमालीची वाढ झाली आहे.
- ३) प्रत्येक चार्जिंगवेळी मशिनला क्षमतेप्रमाणे मॅस्केटचे चार्जिंग होत असल्याने मशिनला योग्य प्रमाणात स्टीम व गरम पाण्याचा वापर करुन मशिनमध्येच साखरेचे योग्य वॉशिंग व ड्राईंग केले जात आहे. ऑटोमेशनपूर्वी कमी-जास्त मॅस्केट चार्जिंगमुळे प्रत्येकवेळी स्टीम व गरम पाणी वापराचे प्रमाण व्यस्त होत असल्याने एक तर मशिनमध्ये साखरेचे वॉशिंग/ड्राईंग व्यवस्थित होत नव्हते किंवा गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होत असल्याने पॅनसाठीच्या स्टीम वापरात वाढ होत होती.
- ४) मशिन क्षमतेच्या पूरेपूर वापरामुळे वीज वापर कमी झालेला आहे. गॅस्केटचे जामींग कमी झालेले आहे.
- ५) ऑटोमेशनमुळे मशिन पुर्ण क्षमतेनुसार चालविता येत असून, साखरेचे वॉशिंग, ड्राइंग व्यवस्थित होऊन, स्टीम, गरम पाणी वापर व मॅनपॉवर वापर कमी झालेला आहे. तसेच अतिरिक्त पाणी वापरामुळे ए-हेवी व ए-लाईटच्या प्युरिटी वाढीमुळे होणारा साखरेचा लॉस कमी करुन साखर उतारा वाढीस मदत झाली आहे.
- सेंट्रिफ्युगलमधील तज्ज्ञ, अभ्यासू श्री. दिलीप वारे हे सेवानिवृत्तीनंतरही साखर उद्योगाची सेवा करत आहेत. त्यांनी शुगर इंडस्ट्रीज परिवार ग्रुपचे ॲडमिन म्हणून अद्वितीय योगदान दिले आहे. साखर उद्योग क्षेत्रातील अद्ययावत माहिती व घडामोडी सर्वांपर्यंत ते अथकपणे पोहोचवतात. त्यांना पुन्हा एकदा ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा!
- समर्पित व्यक्तिमत्त्व
- शुगर इंडस्ट्रीज परिवारचे संस्थापक कै. अविनाश जी कुटे पाटील यांनी 15 / 3/2015 रोजी या ‘शुगर इंडस्ट्रीज परिवार’ची स्थापना केली व तिसऱ्या वर्धापन दिनास निबंध स्पर्धा आयोजित केली , विषय होता ‘आपण करत असलेल्या कामात सुधारणा’ .
- 2016 मध्ये श्री. वारे यांच्या मनात ते करत असलेल्या कामाबाबत एक नवी संकल्पना आली व ती त्यांनी प्रॉडक्शन मॅनेजर आणि टेक्निकल मॅनेजर यांना सांगितली. दोघांनाही त्यांची संकल्पना आवडली व त्यांनी वारे यांना त्यावर काम करण्याची परवानगी दिली, मग वारे यांनी आपल्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी सुद्धा झाला. तो म्हणजे साखर कारखान्यात क्रिस्टलायझर ते पगमील ऑटोमेशन ही सिस्टीम साखर कारखानदारीत पहिल्यांदा श्री. वारे यांनी निर्माण करून यशस्वीपणे चालवली.
- साखर कारखान्यात जे काम सर्वजण करतात, त्या पेक्षा वेगळे काम काय केले यावर वारे यांनी निबंध लिहिला व त्या निबंधाची उत्कृष्ट निबंध म्हणून निवड झाली. ( सदरचा निबंध वर दिलाच आहे). त्याबद्दल श्री. वारे यांचा सन्मानपत्र देऊन राज्य साखर संघाचे एमडी श्री. संजय खताळ, ‘विस्मा’ चे कार्यकारी संचालक अजित चौगुले, राष्ट्रीय साखर महासंघाचे एमडी प्रकाश नाईकनवरे, एस. एस. इंजिनिअर्सचे चेअरमन एस. बी. भड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे सीईओ डी.एम. रासकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
- श्री. कुटे यांचे कोरोना साथीच्या काळामध्ये दुर्दैर्वी निधन झाले व त्यांच्या पश्चात सदर कमिटीने शुगर इंडस्ट्रीज परिवार या ग्रुपचे एडमिन म्हणून श्री. वारे निवड केली, त्या वेळेस 900 सदस्य संख्या असलेला या व्हाट्सॲप ग्रुपची सदस्य संख्या आता 10 हजारपर्यंत पोहोचली आहे व 17 वा ग्रुप सुद्धा येत्या महिनाभरात फुल्ल होईल, अशी स्थिती आहे. श्री. वारे यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. ते २४ तास त्यावर अपडेट देत असतात. ज्यामुळे सदस्य मंडळींची माहिती व ज्ञानाची भूक भागते.