दिलीप वारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त हृद्य सत्कार

पुणे : साखर उद्योगाचा तब्बल चार दशकांचा अनुभव असणारे व्यक्तिमत्व, तसेच शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ श्री. दिलीप वारे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा मोशी ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी साखर उद्योगासह इतर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

शुगर टास्क फोर्सचे संस्थापक सतीश देशमुख, सदस्य साहेबराव खामकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे प्रोसेस मॅनेजर श्री. के पी तिजारे, असिस्टंट इंजिनिअर श्री. खोजे, रयत शिक्षण संस्थेचे मा. प्राचार्य श्री. के. के. रहाटळ , निळवंडे (ता. संगमने हुन आलेले ह. भ. प. प्रकाश महाराज पवार, इतर आप्तेष्ट व स्नेही जन, तसेच भीमाशंकर साखर कारखान्याचे विविध विभागातील कर्मचारी आणि वारे यांचा मित्र परिवार, हितचिंतक आदींची मोठी उपस्थिती होती.
‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने मुख्य संपादक नंदकुमार सुतार यांनी श्री. वारे यांना शुभेच्छा दिल्या.