दिलीपराव देशमुख वाढदिवस विशेष

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कृषी, सहकाराला समर्पित नेतृत्व


राज्याच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात आणि समाजकारणात गेल्या ४५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि आपली खास छाप सोडणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, साखर उद्योग क्षेत्रातील जाणकार श्री. दिलीपराव देशमुख यांचा १८ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे’ परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुरोग्य मिळो आणि ते असेच सक्रिय राहो, अशी प्रार्थना!

राज्याच्या मंत्रिमंडळात दोन वेळा मंत्रीपदी राहिलेले, अनुभवी, उत्तम प्रशासक, कृषी आणि सहकार क्षेत्रात भरघोस योगदान देणारे आणि राज्यभर आपला नावलौकिक करणारे उमदे नेते म्हणजे दिलीपरावजी.

Diliprao Deshmukh


त्यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात साजरा करतात. सामाजिक उपक्रम राबवतात, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान राहिलेले असून जिल्ह्यांतील सहकार व कृषी क्षेत्रातील चळवळ उभी करण्यात, वाढविण्यात त्यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे.


दिवंगत विलासरावजी देशमुख आणि दिलीपरावजी या बंधूंनी लातूर जिल्ह्याचा कायापालट केला. विकासगंगा ग्रामीण भागात पोहोचवली.

त्यामुळे शेती सुधारली, लोकांच्या घरांचे रूपांतर बंगल्यात झाले. दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर गेल्या २५ वर्षांत बदल झाला आहे.

उसाला योग्य भाव सोबतीला ग्रामीण भागातील अर्थवाहिनी आधारवड कृषी क्षेत्राला चालना देणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज पुरवठा करुन सभासदांना वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे काम या नेतृत्वाने केले आहे. कृषी, सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचा उल्लेख करावा लागेल.

उस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक भाव देणाऱ्या यादीत राज्यातील आघाडीवर असलेल्या पहिल्या पाच साखर कारखान्यांत मांजरा साखर परिवाराचे नाव आहे. जिह्यात मागच्या २५ वर्षांत मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने सुरू झाले. पूर्वी मांजरा साखर कारखाना होता त्यांनतर विस्तार वाढत गेल्याने पुढे रेणा, विलास, जागृती, मारुती महाराज, विलास-२, ट्वेण्टी वन असे अनेक साखर कारखाने उभारले.

या विकास प्रक्रियेला दिलीपराव यांच्यामुळे मोठी चालना मिळाली आहे. त्यांना खंबीर साथ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांची आहे. त्यामुळेच आज लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावात आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच एक कायम आर्थिक विकास सुरू झाला.

माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे विकासाचे व्हीजन ज्यांना समजले होते, त्यातील पहिले नेते म्हणजे दिलीपराव. नुसतं समजून भागत नाही, त्या मार्गावर वेगाने चालता यायला हवे.

स्व. विलासरावजींचे स्वप्न पूर्ण करताना, त्यांची धोरणे तंतोतंत राबवणारे आणि अधिक गतीने त्या मार्गावर चालणारे नेतृत्व म्हणजे दिलीपराव. त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी पुन्हा ईशचरणी प्रार्थना!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »