ज्ञानेश्वर साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
पुणे – भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय)चा तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
शनिवार दि.२१ जानेवारी रोजी मांजरी येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते व व्हिएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, जयप्रकाश दाडेगावकर, प्रकाश नाइकनवरे,व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील व इतर मान्यवरांचे उपस्थित हा पुरस्कार स्वीकारला.
मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे,काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, दादासाहेब गंडाळ, भाऊसाहेब कांगूने, बबनराव भुसारी,भाऊसाहेब कांगूने, पंडितराव भोसले, विष्णु जगदाळे,संतोष पावसे, अंबादास कळमकर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,कामगार संचालक सुखदेव फुलारी,संभाजी माळवदे, तांत्रिक सल्लागार एस. डी. चौधरी,एम.एस. मुरकुटे, चीफ इंजीनियर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,मल्हारी कदम आदि उपस्थित होते.