साखरेला खलनायक ठरवू नका !

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : देशभरातील शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards) लावण्याच्या निर्णयावर भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने (ISMA) नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. साखरेला राक्षस किंवा खलनायक ठरवू नका, कुठलीही गोष्टीचा अतिरेक झाला की ती वाईटच ठरते. साखरेचा संतुलित वापर कधीही चांगलाच ठरतो, असे संघटनेने म्हटले आहे.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) च्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, साखर उद्योगाने याला अन्न आणि पोषणबाबत संतुलित दृष्टिकोनाचा अभाव मानले आहे.

ISMAचे महासंचालक दीपक बल्लानी यांच्या मते, साखर नियंत्रणात सेवन केल्यास हानिकारक नाही आणि तिला वाईट ठरवू नये. ते म्हणाले की, शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ लावण्याचा हा निर्णय तरुणांना आणि लवकर प्रभावित होणाऱ्या मनांना एकतर्फी आणि नकारात्मक संदेश देण्याचा धोका निर्माण करतो. असा दृष्टिकोन अन्नपदार्थांबद्दल भीती आणि अपराधीपणा वाढवतो, ज्यामुळे योग्य समज आणि संतुलन बिघडते. बल्लानी यांनी असेही नमूद केले की, साखर फळे आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या अनेक पौष्टिक पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या असते आणि मध्यम गोड सेवन आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक रचनेचा एक सामान्य भाग आहे.

बल्लानी यांनी सुचवले की, आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाली, मानसिक आरोग्य आणि माहितीपूर्ण अन्न निवडीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, केवळ साखरेला मुख्य समस्या मानल्यास मुख्य विषयाकडे दुर्लक्षच होणार आहे. शाळांनी मुलांना भीती घालण्याऐवजी शिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे आणि त्यांना संतुलन आणि जागरूकतेवर आधारित आयुष्यभर निरोगी सवयी विकसित करण्यास मदत केली पाहिजे.

पार्लियामेंटरी सबोर्डिनेट लेजिस्लेशन कमिटीने (Parliamentary Subordinate Legislation Committee) म्हटले आहे की, ही समिती अल्कोहलसह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी समान नियमांना जोरदार समर्थन देते. बहुराष्ट्रीय कंपन्या अनहेल्दी वेस्टर्न स्नॅक्सना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रोत्साहन देत असताना भारतीय पदार्थांना अन्यायकारकरित्या एकटं पाडू नये, असेही समितीने नमूद केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »