महापूर व पाणबुड ऊस पिकाचे व्यवस्थापन
डॉ. बाळकृष्ण जमदग्नी
(नामवंत ऊस तज्ज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र)
महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र हे प्रामुख्याने वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यातील क्षेत्रात विखुरलेले आहे.. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र प्रामुख्याने येतो आणि त्यातील स्त्राला बारमाही आणी मिळू शकते. तथापि, पावसाळ्यात अनेकदा अतिवृष्टी झाली तर पुराचे पाणी उसाच्या शेतात शिरते. अशा पुराचा कालावधी कमी-जास्त असू शकतो. त्यामुळे पीक जास्त दिवस पूर्ण पाण्याखाली गेले तर मोठे नुकसान होते. नुकसानीचे प्रमाण पुराचा बुडीत कालावधी, पिकाच्या संदर्भात पाण्याची पातळी आणि पिकाच्या वाढीची अवस्था (उंची) यावर अवलंबून असते.
इ.स. २०१९ मध्ये कृष्णा, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांना मोठे पूर आले, कोयना, काळम्मावाडी, चांदोली, राधानगरी ही धरणे पूर्णपणे भरून जादा पाणी वाहू लागले. कर्नाटकातील अलमट्टी धरणसुद्धा पूर्णपणे भरले असल्याने त्याचेही पाणी फुगवट्याने मागे येऊ लागले. यामुळे शेकडो गावे पाण्याखाली गेली. शेतीचे अपरिमित नुकसान झाले. अशा पूर परिस्थितीत उसाचा अभ्यास करण्यात आला.
पूरग्रस्त शेतातील उसाच्या प्रामुख्याने ७ अवस्था
१. काही शेतकऱ्यांनी इ.स. २०१९ च्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून २५ जुलैपर्यंत लागणी केल्या. होत्या. हे पीक उगवणीच्या अवस्थेत असतानाच खूप पाऊस झाला. सत्या पाण्याने भरल्या. त्यानंतर पुराचे पाणी शेतात शिरले. दहा-पंधरा दिवस शेती पाण्याखाली राहिली. लागण केलेल्या उसाची उगवण झाली नाही. जे उगवले होते ते कोंभ मरून गेले.
- काही शेतकऱ्यांनी डिसेंबर, २०१८ ते जानेवारी, २०१९ च्या दरम्यान हंगामी लागण केली होती. ते पीक फुटव्याच्या अवस्थेत होते.
- काही शेतकऱ्यांनी २०१८ च्या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये लागण केली होती. तो ऊस १५ ते १८ कांड्यावर होता.
- काही शेतकऱ्यांनी २०१८ च्या जुलै-ऑगस्टमध्ये लावलेला आडसाली ऊस २० ते २२ कांड्यावर होता…
- खोडव्याचे पीक १३ ते १५ कांड्यावर होते. बहुतांशी क्षेत्रात पीक १० ते १५ दिवसांहून अधिक काळ पाण्यात राहिले. नुकसानीचे प्रमाण नदी किनाऱ्यापासून अंतराप्रमाणे व्यस्त आढळले. खालच्या कांड्यावर मुळ्या फुटल्या गेल्या होत्या.
- नदीपात्रातून थोड्या उंचीवरील क्षेत्रातील पीक ३ ते ७ दिवस पाण्यात होते. काही ठिकाणी पुराचे पाणी आले नाही, पण अतिपावसाने सया भरल्या. काही ठिकाणी निचऱ्याच्या जमिनीत एक दिवसापुरते पाणी राहून गेले.
- बुडालेल्या पिकावर चिखलमाती साठली व गाळ सुरळीत साठल्याने शेंडा मर होऊन खालचे डोळे फुटले, खालच्या कांड्यांना मुळ्या फुटल्या.
…
पाणबुड परिस्थितीचा शेतजमिनीवरील परिणाम
1.दीर्घकाळ पाणबुड परिस्थितीमुळे जमिनीतील हवा व प्राणवायू निष्कासित होतो. मुळाचे श्वसन मंदावते व कार्बनडाय ऑक्साईड साठून राहतो. अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थापासून मिथेन वायू निर्माण होतो. हे
2.दोन्ही वायू विषारी घटक पातळीवर जाऊन पिकाला हानी करतात. प्राणवायू संपुष्टात आल्यामुळे जमिनीतील अॅझोटोबॅक्टर, पीएसबी व इतर उपयुक्त जीवाणू मरून जातात. जमिनीतील जैविक घटक नष्ट होतो. जमीन मृतप्राय होते.
- पाणबुड जमिनीचा पीएच साधारणतः ६.५ ते ७ असा राहतो. अॅसिडिक जमिनीत तो वाढतो, पण चुनखडीयुक्त जमिनीत कार्बनडाय ऑक्साईड विरघळल्यामुळे कार्बोनिक अॅसिड तयार होते.
- चांगल्या भुसभुशीत जमिनीत हवेचे प्रमाण चांगले असते. अशा जमिनीचे रिडॉक्स पोटेन्शियल ५०० ते ७०० मि.ली. व्होल्ट असते. पाणबुड परिस्थितीत हा निर्देशांक – ३०० ते ४०० मि.ली. व्होल्ट इतका होतो. त्यामुळे मातीच्या कणावरील विद्युत भार नष्ट होतात. मातीच्या कणांचे बंध (बॉन्ड्स) नष्ट होतात. माती मृतप्राय होते. पोषणद्रव्ये उपलब्ध होत नाहीत.
- पाणबुड क्षेत्रात पोषण द्रव्यांचा समतोल बिघडतो. प्रामुख्याने नत्र वाहून जाते, जिरून जाते. पिकावर नत्राची कमतरता येते. अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात रूपांतर करण्याचे जमिनीमधील कार्य बंद होते.
- पाणबुड क्षेत्रातील जमिनीतील वायुविरहित अवस्थेत काम करणारे बॅक्टेरिया (Unaerobic Bacteria) हे मॅगेनीज ऑक्साइड व फेरीक ऑक्साइडचे रूपांतर मँगेनीज व फेरस ऑक्साइडमध्ये करतात. एका आठवडाभरात ही अन्नद्रव्ये विषारी पातळीवर पोचतात.
- अनएरोबिक बॅक्टेरियामुळे अमोनियम सल्फेट, हायड्रोजन सल्फाइड असे घातक रासायनिक पदार्थ निर्माण होतात.
पाणबुड स्थितीचा उसाच्या वाढीवर होणारा परिणाम
- एकंदरीत वाढ खूप मंदावते.
- मुळातील वाहक नलिका बंद होतात.
- प्रत्येक कांड्यातून मूळपट्टीकेमधून हवेतील मुळे (Aerial roots) येतात. ही मुळे जमिनीतून येणाऱ्या मुळापेक्षा वेगळी असतात. पाणबुड परिस्थितीत जुळवून घेण्याचा तो प्रयत्न असतो.
- पानांची लांबी, रुंदी, आकार कमी होतो. सुरळी होऊ लागते. पाने पिवळी होतात. खालची पाने सुकतात. पानांवर गाळ साचल्याने कर्ब ग्रहण क्रिया थांबते.
- उसाची बेटे वेगाने मरू लागतात. जे जगतात त्यांच्या कांड्या आखूड असतात, कमजोर असतात, उसाची उंची, कांड्याची लांबी, जाडी व संख्या कमी होते. उत्पादन फार कमी होते.
- उसामध्ये धाग्याचे प्रमाण वाढते. ऊस पोकळ होऊन भेडाळतो.
- काड्यातून पांगशा (डोळे) फुटतात.
- पाणी आणि पोषणद्रव्यांचे शोषण थांबते. अन्नद्रव्याची कमतरता दिसू लागते।
इनव्हर्टेज नावाने विकर (Enzyme) तयार होते. त्यामुळे उसातल्या तयार साखरेचे (डायसँकराईड किंवा सुक्रोज) रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. - उसामध्ये कोलाईडस (कलिके), डिंक, पेक्टीन, प्रथिनरहित नत्र याचे प्रमाण वाढते. फॉस्फेटचे प्रमाण घातक पातळीवर जाते.
- पीक रोग व किडीना लागलीच बळी पडते.
- मुळे निष्क्रय, मृतवत होतात. जमिनीवरची पकड कमी होते. पीक लोळते.
- तग धरून राहिलेले ऊस सुद्धा वेगाने सुकू लागतात,
- गूळ केला तर त्याला गुणवत्ता नसते:
- खोडवे चांगले येत नाही.
पाणबुडित उसाचे व्यवस्थापन
उगवण आणि आरंभ वाढीच्या अवस्थेतील ऊस सलग एक आठवडाभर पाण्याखाली राहिला तर कोभ किंवा रोपे मरून जातात. अशा परिस्थितीत पूर ओसरून शेतात वाफसा आल्यानंतर पूर्वीच्याच सन्यामध्ये रिजर चालवून जमीन पुन्हा एकदा भुसभुशीत करून घ्यावी. यामध्ये सुपरकेन नर्सरी पद्धतीने तयार केलेली जोमदार निरोगी रोपे लावावीत. पाऊस असल्यास व सरीत पाणी साठण्याची शक्यता असल्यास रोपे सरीच्या बगलेवर लावावीत पूर्वी बेसल डोस दिला असल्यास परत द्यायची गरज नाही. तथापि, अँझोटोबॅक्टर, पीएसबी ट्रायकोडर्मा, मेटारायाझिम, बिव्हेरिया यांच्या आळवण्या द्याव्यात पाणबुड अवस्थेमुळे जमिनीतले जीवाणू सुप्त अवस्थेत गेलेले असतात. म्हणून ही उपाययोजना करावी. पुढे खताचे हप्ते आणि संजीवकाच्या फवारण्या देऊन ऊस जोपासावा,
नदीलगतच्या क्षेत्रातील आडसाली, पूर्व हंगामी, सुरू आणि खोडव्याचा जोमदार अवस्थेतील ऊस ८ ते १० दिवस पाण्यात बुडाला तर तो मोठया प्रमाणात कुजतो अथवा वाळून कडब्यासारखा दिसतो. असा ऊस थोडाफार प्रमाणात जगला तरी त्याचे हवे तसे अपेक्षित उत्पादन येत नाही. यावर खालीलप्रमाणे उपाययोजना करावी.
जमिनीतील दलदल कमी झाल्यावर ऊस कापून आडवा पाडावा. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये उन्हाने चांगला तापू द्यावा आतून भेडाळलेला (पोकळ) झाला असल्यामुळे हा ऊस हलका झालेला असतो. पाचट कुटी यंत्राने अथवा रोटावेटरने पालाकुट्टीप्रमाणे तुकडे करावेत. यावर एकरी ५० किलो युरिया + ५० किलो सिंगल सुपर फोस्फेट + ५ किलो पाचट कुजवणारे जीवाणू ५०० किलो सेंद्रिय (कंपोस्ट खतात मिसळून पसरावे. रोटोवेटरने उसाचे अवशेष व खते जमिनीत गाडून टाकावीत. त्यामुळे शेतात कुजून त्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर होते.
याप्रमाणे तयार झालेल्या शेतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हरभरा, राजमा (घेवडा). मोहरी यासारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकापैकी एखादे पीक घ्यावे. याचा बेवड चांगला होतो. जमिनीत हवा खेळती राहून सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. जमिनीतील भौतिक, रासायनिक व जैविक घटकांची सुधारणा होते. सुपिकता वाढते. वरील पिकाऐवजी चैचा किंवा ताग यांचे हिरवळीचे खतांचे पीक सुद्धा घ्यायला हरकत नाही दीड महिन्याचा लाग जमिनीत गाडताना त्यावर एकरी १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो युरिया पसरावा. कडधान्य पिकाच्या बेवड़ाने किंवा हिरवळीच्या खताने समृद्ध झालेल्या जमिनीमध्ये ४.५ ते ५ फूट रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात. या दरम्यान सुपरकेन नर्सरी पद्धतीने रोपे तयार करावीत. रुंद सरीमध्ये बेसल डोस देऊन रोपांची लागण दीड फूट अंतरावर करावी. पुढे जीवाणूंच्या आळवण्या, खतांचे हप्ते, संजीवके फवारण्या, आंतर मशागत, कीड, रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण इ. करून पीक जोपासावे. या हंगामासाठी (पूर्वहंगामी) फुले १०००१ हा वाण वापरणे उत्तम. बेणे न मिळाल्यास को-८६०३२ लावण्यास हरकत नाही.
नदीच्या पात्रापासून थोड़ा दूर हंगामी ऊस तर नदी पुराच्या कक्षेत पूर्वहंगामी ऊस लागवड असावी. तसेच फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचे खोडवे अशा क्षेत्रात घेणे टाळावे. तसेच नदीजवळ आडसाली व हंगामी लागवड टाळणे इस्ट नदीजवळ खोडवा घेणेसुद्धा टाळावे, शक्य असल्यास पूर ओसरल्यानंतर शेतात साचलेले पाणी निचरा करून काढून टाकावे. वाफसा येताच आंतरमशागत करून जमीन भुसभुशीत करावी. ऊस लोळला असेल तर बांधून उभा करावा. त्यामुळे कांड्याचा जमिनीशी संपर्क येणार नाही. उसाला मुळ्या व पांगशा (डोळे) फुटण्याचे प्रमाण कमी राहील.
वाळलेली पाने अथवा फुटवे काढून शेतात पसरावेत, त्यावर एकरी २ लिटर पाचट कुजवणारे जीवाणू २०० लिटर पाण्यात मिसळून शिपण करावे. पाचट कुजविण्यासाठी त्यावर एकरी ५० किलो युरिया आणि ५० कि. सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे.
क्रियाशील जीवाणूची संख्या वाढविण्यासाठी एकरी १ लिटर ट्रायकोडर्मा + १ लिटर व्हीएसआयचे सॉईल हेल्थ जीवाणू अर्क + २५० ग्रॅम पाण्यात मिसळावे. ह्युमिक अँसिड पावडर ३०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
मुळांचे पुनरुज्जीवन, अन्नद्रव्यांचे शोषण आणि वहन चांगले व्हावे, उसाची वाढ जोमदार व्हावी, यासाठी २०० लिटर पाण्यात संजीवके २ किलो १९:१९:१९ + २०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + ४०० मिली क्लोरोपायरीफॉस (२०.५ EC) यांच्या द्रावणाची मुळाच्या परिसरात आळवणी करावी. (आयबीए हे अल्कोहोलमध्ये विरघळते तर सिक्स बीए सोबत त्याचे सॉलव्हंट मिळते).
पाणबुडीत परिस्थितीमुळे अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडलेले असते. त्यांच्या पूर्ततेसाठी वाफशावर एकरी १०० कि. अमोनियम सल्फेट, ५० कि. म्युरेट ऑफ पोटॅश, १० किलो, मॅग्नेशियम सल्फेट, १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण, ४० किलो सिलिकॉन, ५ किलो ह्युमिक अॅसिड ग्रॉन्युल्स आणि १० किलो रिजट ग्रॉन्युल्स उसाच्या मुळ्यांच्या परिसरात द्यावेत व मातीआड करावेत. यामुळे पाणबुडीत क्षेत्रातील ऊस चांगल्या प्रकारे वाढू शकतो. वासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, यामुळे पाणबुडीतील उसाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.
उसाच्या वाढीची परिस्थिती पाहून शक्य असल्यास खालीलप्रमाणे फवारण्या घाव्यात –
फवारणी क्र. १
एकरी २०० लिटर पाण्यात १ किलो १३:०:४५ + २५० ग्रॅम चिलेटेड मायक्रो न्युट्रअंट मिश्रण + २०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम + २०० मिली क्लोरोपायरीफॉस (२०.५ EC) + संजीवके ही फवारणी खताची मात्रा दिल्यानंतर द्यावी. यामुळे पाणबुड अवस्थेने आलेल्या ताणांचे निवारण होते. पीक संरक्षण होते. पिकाला चांगला जोम येतो…
फवारणी क्र. २
- व्हीएसआय निर्मित मल्टिमायक्रो प्रत्येकी ३ लिटर + वसंत ऊर्जा १५ लिटर + १५ लिटर व्ही. एम. ३०० लिटर पाण्यात मिसळून एक एकरासाठी फवारणी घ्यावी. त्यामुळे प्रमुख अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता होऊन पीक संरक्षण होते.
- गांडूळांची संख्या वाढण्यासाठी अमृतपाणी आळवणी करावी. यासाठी २०० लिटर पाण्यात देशी गाईचें
शेण + १०० ग्रॅम तूप + २०० ग्रॅम मध मिसळून द्रावण करावे व त्याची आळवणी करावी. गोगल गाईचा जास्त प्रादुर्भाव दिसल्यास २५% मेटाल्डीहाइड या अमिशाचा वापर करावा. - पिकाला नवीन पाने येणे, पाने लांब व रुंद होणे, मुळांची वाढ होणे यासाठी चुन्याच्या निवळीची (चुन्याची नव्हे) आळवणी अथवा फवारणी जमेल तेव्हा करावी. यासाठी १०० लिटर पाण्यात २ किलो खाण्याच्या चुन्याची निवळी (चुना नव्हे) हे प्रमाण ठेवावे.
याप्रमाणे पाणबुड उसाचे व्यवस्थापन करावे, यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
\\\\\\\